शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसंख्या घटल्याने अ‍ॅम्ब्युलन्सही निम्म्यावर; टीएमटी बस केल्या होत्या परावर्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:46 IST

अजित मांडके ठाणे : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील कोविड रुग्णालयातील सुमारे १२०० ...

अजित मांडकेठाणे : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे शहरातील कोविड रुग्णालयातील सुमारे १२०० बेड शिल्लक आहेत. साहजिकच, आता महापालिकेकडे असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सची संख्याही कमी झाली आहे. ही संख्या ८० वरून ४० वर आली आहे.

गेल्या काही महिन्यात शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता जाणवत होती. परंतु गेल्या काही दिवसात रुग्ण कमी झाल्याने अ‍ॅम्ब्युलन्स पुरेशा ठरत असून रुग्णांना आता वेळेत अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत आहेत. सुुरुवातीला काही ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स पोहोचण्यास पाच ते सहा तासांचा कालावधी लागत होता. परिणामी, दोन ते तीन रुग्णांचे मृत्यूदेखील झाले. खाजगी रुग्णालयांच्या अ‍ॅम्ब्युलन्स किंवा खाजगी अ‍ॅम्ब्युलन्स यांनी रुग्णांची लूट केली. जवळच्या अंतरासाठीदेखील ८ ते १० हजार रुपये आकारले जात होते. अ‍ॅम्ब्युलन्स अनुपलब्धतेचा विषय गाजल्याने टीएमटी बसचे अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले. त्यामुळे महापालिकेकडे ८० रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या. त्यानंतर, रुग्णांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत उपलब्ध होऊ लागल्या. रुग्णांचे होणारे हाल थांबले.

आता ठाण्यात रुग्णांची संख्या कमी झाली, त्यामुळे महापालिकेने आपल्या सेवेतील ४० अ‍ॅम्ब्युलन्स कमी केल्या. यामध्ये मुख्यत्वे टीएमटीच्या बसगाड्या ज्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये परावर्तीत केल्या होत्या, त्या कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये महापालिकेच्या चार, खाजगी संस्थेच्या सहा आणि कार्डिअ‍ॅक १० व आॅक्सिजन रुग्णवाहिकांचा समावेश आहे. तर, हॉस्पिटलमधून घरी सोडण्यासाठी सध्या रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. दिवसाला ५० च्या आसपास फेऱ्या होत आहेत. रुग्णांची संख्या कमी झाल्याने अ‍ॅम्ब्युलन्स पडून होत्या. त्यामुळे त्यांची संख्या कमी केली आहे.अ‍ॅम्ब्युलन्स कमी; रूग्णांची होत होती लूटशहरातील वाढती रूग्णसंख्या पाहता अ‍ॅम्ब्युलन्सही अपुºया पडत होत्या. त्याचा फटका काही रूग्णांना बसला. त्यामुळे महापालिकेने टीएमटी बसचे अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रूपांतर केले होते.आता रुग्णांना वेळेवर अ‍ॅम्ब्युलन्स मिळत असल्याने तक्रारी शून्यावर आल्या आहेत. रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने रुग्णवाहिकांची संख्या कमी करण्यात आली आहे. मात्र, गरज पडल्यास तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात येतील. - केदार पाटील, रुग्णवाहिका प्रमुख, ठाणे महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या