शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या डेंटल कॉलेजला दातखिळी

By admin | Updated: February 24, 2017 06:59 IST

मागील तीन ते चार वर्षांपासून वादात सापडलेल्या अंबरनाथमधील गार्डियन डेंटल कॉलेजला आता कायमची

अंबरनाथ : मागील तीन ते चार वर्षांपासून वादात सापडलेल्या अंबरनाथमधील गार्डियन डेंटल कॉलेजला आता कायमची दातखिळी बसली आहे. या महाविद्यालयातील २०१६-१७ या वर्षातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला केंद्र सरकारच्या आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाने मान्यता नाकारली आहे. तसेच हे महाविद्यालय बंद करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिले आहेत. अंबरनाथमधील जांभूळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गार्डियन महाविद्यालय उभारले होते. मात्र, सुरुवातीपासूनच हे महाविद्यालय प्रवेशावरून आणि नंतर बेकायदा इमारतीवरून वादात सापडली. बनावट कागदपत्रे तयार करून हे महाविद्यालय उभारण्यात आले होते. याप्रकरणी सरकारच्या विविध स्तरांवर त्याच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच २०१०-११ आणि २०११-१२ या वर्षाच्या बीडीएस अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी केंद्र सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे प्रवेश घेतलेल्या ५५ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. अखेर, या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दंत महाविद्यालयामध्ये स्थलांतरित करण्यात आले. तसेच याप्रकरणी महाविद्यालयाला प्रत्येक विद्यार्थ्यामागे १ लाखांचा दंडही भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, दंडाचा रक्कम असलेला धनादेश न वठल्याने पुन्हा हे महाविद्यालय चर्चेत आले. हे कमी होते की काय, या महाविद्यालयाची पालिकेने बांधकाम परवानगीही रद्द केली. यासोबतच जमीनमालकाच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून त्या आधारावर बांधकाम परवानगी घेतल्याचे उघड झाल्याने याप्रकरणीही महाविद्यालयाच्या प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. वाद असतानाही महाविद्यालय प्रशासन उघडपणे महाविद्यालय सुरूच ठेवून विद्यार्थ्यांची फसवणूक करीत होते. याप्रकरणी नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यांनी सरकारकडे तक्रार करून हे महाविद्यालय कायमचे बंद करण्याची मागणी केली होती. (प्रतिनिधी)