शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथ चित्रपट महोत्सव : अंकुश चौधरी, मनोज जोशी सर्वोत्कृष्ट अभिनेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 22:56 IST

‘माई घाट क्राइम’ चित्रपट सर्वाेत्कृष्ट

अंबरनाथ : अंबरनाथ येथे अंबरभरारी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे झालेल्या पाचव्या चित्रपट महोत्सवात यंदा ‘माई घाट क्राइम नं १०३/२००५’ हा चित्रपट सर्वाेत्कृष्ट ठरला. तर, या महोत्सवात सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याचा मान अंकुश चौधरी (ट्रिपल सीट) आणि मनोज जोशी (आता बस्स) या दोघांना विभागून देण्यात आला. सर्वाेत्कृष्ट अभिनेत्रीचा मान सावट चित्रपटासाठी स्मिता तांबे यांना देण्यात आला. अंबरनाथच्या गावदेवी मैदानावर दिमाखदार सोहळ्यात हा महोत्सव पार पडला.

अंबरनाथमधील अंबरभरारी या ग्रुपच्या पुढाकाराने सलग पाचव्या वर्षी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. चित्रपटांचे नामांकन आणि त्यांचे परीक्षण झाल्यावर या महोत्सवाचा पारितोषिक समारंभ रविवारी, १२ जानेवारीला गावदेवी मैदानावर आयोजित करण्यात आला होता.

अंबरभरारीचे प्रमुख सुनील चौधरी आणि गुणवंत खिरोदिया यांच्या पुढाकाराने हा महोत्सव भरवण्यात आला होता. भव्य असे रंगमंच आणि सिनेकलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या महोत्सवात सर्वांना ओढ होती, ती सर्वाेत्कृष्ट चित्रपटाची. यंदा हा मान ‘माई घाट क्राइम’ चित्रपटाला देण्यात आला.

पुरस्कार सोहळ्यासोबत इतर मनोरंजनाचे कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आले. निखिल चौधरी, रमेश कोळी आणि निषाद जोशी यांनी हे सादरीकरण केले. तर, संपूर्ण कार्यक्रमात प्रेक्षकांना खेळवत ठेवण्यासाठी सूत्रसंचालनाची जबाबदारी अमेय रानडे आणि पूर्वी भावे यांच्यावर होती. या कार्यक्रमाला आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, ज्येष्ठ अभिनेत्या उषा नाडकर्णी, अभिनेते अंकुश चौधरी, संगीतकार अशोक पत्की आदी उपस्थित होते.स्वप्नील बांदोडकर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकसर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपटाचा मान ‘ट्रिपल सीट’ चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट ऐतिहासिक चित्रपट फत्ते शिकस्त, सर्वोत्कृष्ट संगीत एक निर्णय या चित्रपटातील कमलेश भडकमकर आणि रोहन देशमुख यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा मान स्वप्नील बांदोडकर, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आनंदी जोशी यांना देण्यात आला.यंदाचा जीवनगौरव पुरस्कार किशोर नांदलस्कर यांना देण्यात आला. कारकीर्द सन्मान म्हणून अशोक पत्की यांचा गौरव करण्यात आला. तंत्रज्ञ गौरव म्हणून मनोहर आचरेकर तर सिनेपत्रकारिता गौरव संतोष भिंगार्डे यांना देण्यात आला.