शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथसह २७ गावांच्या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:59 IST

जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ शिक्षकांच्या या आॅनलाइन बदल्या विविध समस्यामुळे चर्चेत आल्या आहेत. आता त्यात कल्याण डोंबिवली मनपा परिसरातील २७ गावे आणि अंबरनाथ तालुक्यातील नऊ गावे यातील सुमारे शंभरपेक्षा अधिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र, तरीही या शिक्षकांनी बदलीच्या ठिकाणी हजर होण्याची अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे हा शिक्षकवर्गही संभ्रमावस्थेत सापडला आहे.जिल्हा परिषदेच्या या आॅनलाइन बदल्या विविध कारणांखाली गाजत आहेत. अन्याय सहन करून घ्यायचा नाही, या मानसिकतेतील शिक्षकवर्ग अन्यायाविरोधात न्यायालयात धाव घेत आहे. बनावट कागदपत्रे, सेवाज्येष्ठता डावलल्याने, वैद्यकीय कागदपत्रे बनावट दिल्यामुळे या बदल्यांमध्ये आधीच अडथळे येत आहेत. त्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठेवण्याची मागणी २७ गावांमधील शिक्षकांनी आधीच केली आहे. यात ८० ते ८५ शिक्षकांचा समावेश आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नऊ गांवामधील शिक्षकांनीदेखील नगरपालिकेत राहण्याचे मागणी लावून धरली आहे. यामुळे या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केल्या आहेत. पण त्यास न जुमानता या शिक्षकांनी बदली झालेल्या शाळांवर हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेमधील २७ गावांच्या शाळा जिल्हा परिषदेत वर्ग न करता त्या महापालिकेतच ठेवाव्यात. यासाठी भाल, व्दारली, वसार, चिंचपाडा आदी २७ गावांच्या शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांची सुनावणी ४ जून रोजी आहे. तर जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील नऊ गावांच्या शाळा अंबरनाथ नगरपालिकेकडे वर्ग झालेल्या नाही. यामध्ये पाले, चिखलोली, जावसई, फॉरेस्टनाका आणि जांभवली आदी या नऊ गावाचा समावेश आहे. या शिक्षकांनादेखील २७ गावांच्या शिक्षकांप्रमाणे ३० टक्के घरभाडे लागू आहे. यामुळे या नऊ गावांमधील प्राथमिक शिक्षकांनी न्यायालयात धाव घेऊन या आॅनलाइन बदल्यांविरोध स्थगिती मिळवली आहे.याप्रकरणी सुनावणी ७ जून रोजी उच्च न्यायालयात आहे. न्यायालयात धाव घेऊन या शिक्षकांनी या आॅनलाइन बदल्यांना स्थगिती मिळवलेली आहे. पण या शिक्षकांनी वेळीच हजर होण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून व्यक्त होत असल्यामुळे या शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यावर शिक्षण विभागाकडून बोलणे टाळले जात आहे. त्यामुळे एकूण शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था आहे.बदलीच्या शाळांवर हजर व्हा!सर्व शिक्षकांच्या बदल्या आॅनलाइन झालेल्या आहेत. २७ गावांमधील शिक्षकांचाही समावेश आहे. त्यांनी बदली शाळांवर हजर व्हायला पाहिजे, असे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे