शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ओमान येथे अडकलेल्या अंबरनाथच्या महिलेची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 03:04 IST

नोकरीच्या आशेने परदेशात जाणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेदा एजंटमार्फत परदेशात विशेषत: आखाती देशात गेलेल्यांना फसवणूक आणि छळाचा सामना करावा लागतो.

मुंबई : नोकरीच्या आशेने परदेशात जाणा-यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेदा एजंटमार्फत परदेशात विशेषत: आखाती देशात गेलेल्यांना फसवणूक आणि छळाचा सामना करावा लागतो. अशाच पद्दतीने मस्कत, ओमानमध्ये अडकून पडलेल्या अंबरनाथ येथील महिलेची राज्य महिला आयोग आणि परराष्ट्र मंत्रालयाने सुटका केली.आर्थिक अडचणीमुळे अंबरनाथ येथील फरीदा खान २७ जानेवारी २०१८ ला नोकरीसाठी दुबईत गेल्या. एजंटमार्फत दुबईला गेलेल्या खान यांचा त्यानंतर परिवाराशीच संपर्क तुटला. त्यामुळे पती अब्दुल अजीज खान यांनी महिला आयोगाच्या ह्यसुहिताह्ण (७४७७७२२४२४) या हेल्पलाईनवर आपली व्यथा मांडत, मदतीचे आवाहन केले. महिला आयोगाने याची दखल घेत परराष्ट्र खात्याकडे पाठपुरावा केला. ओमान येथील भारतीय दूतावासाने ओमान येथील एजंटकडे याबाबत चौकशी सुरु केली. त्यानंतर फरीदा खान यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आणि १ मे च्या रात्री त्यांना मुंबईकडे रवाना करण्यात आले.फरीदा खान यांना दुबईवरून मस्कतला पाठविण्यात आले होते. कामाच्या ठिकाणी त्यांचा छळ होत होता. शिवाय, पासपोर्ट व इतर कागदपत्र जप्त केल्याने त्यांचे परतीचे मार्ग ही बंद झाले होते. परदेशातील या छळामुळे फरिदा खान मानसिकदृष्टया खचल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. एकप्रकारच्या बंदिवासात अडकलेल्या फरिदा खान यांची महिला आयोग आणि परराष्ट्रा खात्यामुळे सुटका झाली. त्याबद्दल फरिदा खान आणि त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. अनेक महिला नोकरीसाठी दुबई, मस्कतला जातात. मात्र त्यांना गुलामासारखी वागणूक दिली जाते. या छळात सापडलेल्या अन्य महिलांनाही सोडवावे अशी विनंती खान यांनी यावेळी केली.याबाबत बोलताना विजया रहाटकर म्हणाल्या कि, ह्यसुहिताह्ण या नव्यानेच आयोगाने सुरु केलेल्या हेल्पलाइनवर ही तक्रार आली होती. आयोगाने परराष्ट्र मंत्रालयामार्फत सर्वतोपरी मदत केली आणि आज फरीदा परत आपल्या २ मुली आणि पतीसोबत आहेत. भविष्यात अशा घटनांचा महिलांना सामना करावा लागू नये यासाठी आयोग परराष्ट्र मंत्रालयासोबत काम करणार आहे. तसेच महिलांची फसवणूक करणा-या एजंट विरोधात ही कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचना देण्यात येतील.