शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरमध्येही मोफत वायफाय सेवा द्या

By admin | Updated: January 23, 2017 05:25 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने मुख्यालयासह काही ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मुंबईच्या

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेने मुख्यालयासह काही ठिकाणी मोफत वायफाय सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मुंबईच्या धर्तीवर सरकारने संपूर्ण शहरात ही सुविधा मोफत द्यावी, या मागणीचे पत्र मनपा संगणक विभागाने सरकारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. इंटरनेटच्या आॅप्टिकल फायबर केबल्स अनेक खाजगी कंपन्यांनी जमिनीखाली टाकल्या आहेत. या कंपन्यांनी किमान पालिका कार्यालयांना वायफायची सुविधा मोफत पुरवण्याचा सरकारी आदेश असतानाही त्याकडे प्रशासनाने अद्याप दुर्लक्ष केले आहे. त्यातच, पालिकेने कर्मचाऱ्यांसाठी ठरावीक कंपन्यांचे नेटवर्क घेतले आहे. सुरुवातीपासूनच या कंपन्यांकडून मोफत इंटरनेट, कनेक्टिव्हिटी अथवा वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला नाही. दरम्यान, पालिका मुख्यालयात ठाणे पालिकेच्या धर्तीवर मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याची मागणी शिवसेनेचे युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक यांनी केली होती. त्याकडेही दुर्लक्ष केले. मात्र, पाठपुराव्यामुळे वर्षभरानंतर पालिका मुख्यालयासह कनाकिया येथील नगररचना कार्यालयात मोफत वायफाय सुविधा सुरू झाली. तत्पूर्वी व्होडाफोनने मुख्यालय व कनाकिया येथील कार्यालयात इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुरू करण्यात आली. यानंतर, प्रशासनाने महापौर गीता जैन यांच्या मागणीनुसार ११ उद्यानांत मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच संगणक विभागाने प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावानुसार अलीकडेच भारतरत्न इंदिरा गांधी व पंडित भीमसेन जोशी रुग्णालयासह रामनगर विभागीय कार्यालय, स्थानिक संस्था कर कार्यालयात वायफाय सुविधेला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)