शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरी रोखण्यास ‘युती’ची हूल

By admin | Updated: January 11, 2017 07:03 IST

भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु होत असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही

ठाणे : भाजपा आणि शिवसेना यांच्यातील महापालिका निवडणूक जागावाटपाच्या वाटाघाटी सुरु होत असल्याचे सांगितले जात असले तरी दोन्ही पक्षातील बंडखोरांना रोखण्याकरिता युती होत असल्याची हूल उठवण्यात आली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. स्वतंत्र लढून सत्तेकरिता एकत्र यायचे हेच धोरण या निवडणुकीतही अमलात आणले जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.महापालिका निवडणुकांचे वेळापत्रक अजून जाहीर झालेले नाही. कार्यक्रम जाहीर झाल्यावर उमेदवारी अर्ज दाखल करेपर्यंतच्या काळात बंडखोर इकडून तिकडे पळ काढतात. भाजपा-शिवसेनेच्या वाटाघाटी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत सुरु ठेवून ऐनवेळी दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले की, बंडखोरांना हालचाली करण्यास फारसा वाव उरत नाही. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत हीच रणनीती अमलात आणली होती. आता मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड अशा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीत तीच खेळी हे पक्ष खेळणार आहेत.मुंबई, ठाण्यात आपला वॉर्ड युतीत भाजपाकडे राहणार की शिवसेनेकडे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत बंडखोर पळ काढू शकत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक वाटाघाटींची भूमिका घेतली आहे. ठाण्यात गुरुवारी होणाऱ्या भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे कामकाज खुले ठेवलेले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्य कार्यकारिणीत मधू चव्हाण व अन्य काही नेत्यांनी शिवसेनेसोबतची युती तोडण्याची भाषा केली होती. त्यानंतरही दोन्ही पक्षातील काही नेते अखेरपर्यंत वाटाघाटी करीत राहिले व अखेरीस युती तुटली होती. त्याचीच पुनरावृत्ती ठाण्यात अपेक्षित आहे. गुरुवारी काही भाजपा नेते शिवसेनेवर टीका करतील तर मुख्यमंत्री फडणवीस हे समन्वयवादी भूमिका घेतील, अशी चर्चा आहे.युती करायची असेल तर सर्वत्र करा, अशी अट शिवसेनेने घातली आहे. मुंबई, ठाणे सोडले तर अन्यत्र भाजपाची लढाई ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसे यांच्याशी आहे. त्या ठिकाणी शिवसेनेला जागावाटपात भागीदार करुन घेण्यास स्थानिक भाजपा नेत्यांचा विरोध आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा ही धूळफेक असल्याचे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)