शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ व पालकांची लूट करत असल्याचा आरोप

By धीरज परब | Updated: June 12, 2023 20:25 IST

शिक्षण अधिकाऱ्यां समोर आंदोलकांचा ठिय्या

मीरारोड - आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक देत छळ केला जातोय व पालकां कडून बेकायदेशीरपणे बळजबरी शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप एका खाजगी शाळेबाबत करत पालकांसह मनसे कार्यकर्त्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्या समोर ठिय्या आंदोलन केले . तक्रारी करून देखील महापालिका कार्यवाही करत नसल्याचा संताप पालकांनी व्यक्त केला . 

सोमवारी भाईंदरच्या नगरभवन मधील शिक्षण विभागाच्या कार्यालयात पालकांसह मनसेचे सचिन पोपळे , रॉबर्ट डिसोझा आदींनी ठिय्या आंदोलन केले . शिक्षण अधिकारी सोनाली मातेकर यांच्या कडे तक्रारी आरोपांच्या फैरी पालक व मनसेने झाडल्या . 

आरटीई अंतर्गत १ हिली ते ५ वी इयत्तेत प्रवेश घेतलेल्या मुलांना पाठ्यपुस्तक, गणवेश व इतर शालेय साहित्य मोफत न देता विकत घेण्याची सक्ती मीरारोडच्या यू. एस. ओस्तवाल इंग्लिश अकॅडमी शाळेने चालवली आहे . शैक्षणिक शुल्क न भरल्याने वर्गात बसू न देता इतर विद्याथ्यांपेक्षा वेगळी दुय्यम दर्जाची वागणूक देऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान व मानसिक छळ करून बालमनावर दुष्परिणाम केला जात असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी पोपळे  तसेच राजेश जाधव आदी पालकांनी केला . 

यावेळी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली . या आधी देखील पालकांनी सातत्याने तक्रारी केल्या असून पालिकेच्या आधीच्या अधिकाऱ्यांनी शाळेला पत्र देखील दिली होती असे जाधव यांनी सांगितले . तर चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणार असे आश्वासन शिक्षणाधिकारी मातेकर यांनी दिल्या नंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले . 

टॅग्स :mira roadमीरा रोड