शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

घनकचरा सेवा शुल्काच्या नोटीसा मागे घेण्यासाठी महासभेत सर्व पक्षीय नगरसेवक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:47 IST

महापालिकेकडून पुन्हा घनकचरा सेवा शुल्क वसुलीच्या नोटीसा बजावण्याची सुरवात झाल्याने व्यापारी हवालदील झाले आहेत. त्यामुळे या नोटीसा मागे घेण्यात याव्यात आणि महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शुक्रवारच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली.

ठळक मुद्देमहासभेच्या ठरावाची अद्यापही अंमलबजावणी नाहीसर्व पक्षीयांचा डोळा पुन्हा व्यापारी मतांवर

ठाणे - महासभेत ठराव होऊनही त्याची अंमलबजावणी न करता पुन्हा ठाणे महापालिकेकडून शहरातील व्यापाऱ्यांना घनकचरा सेवा शुक्ल वसुलीच्या नोटीसा पाठविल्या गेल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या महासभेत गाजला. या नोटीसा मागे घ्याव्यात आणि महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली.         महापालिका हद्दीतील व्यापाऱ्यांकडून घनकचरा सेवा शुल्क आकारणीचा प्रस्ताव दोन वर्षांपुर्वी प्रशासनाने सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला होता. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाने मागील वर्षीपासून त्याची अंमलबजावणी सुरु केली होती. मात्र, त्यास व्यापारी वर्गातून विरोध होऊ लागल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव रद्द करण्यासाठी ठराव केला होता. असे असतानाही गेल्या काही महिन्यांपासून महापालिका प्रशासनाने या कराच्या वसुलीलसाठी पुन्हा नोटीसा पाठविल्या आहेत. यामुळे शिवसेनेसह व्यापारी मतांवर विसंबुन असलेल्या भाजपमध्येही अस्वस्थता पसरली होती. तसेच या कर वसुलीवरून प्रशासन विरु द्ध राजकीय पक्ष असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच शुक्र वारी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये नौपाड्यातील भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी या कराचा मुद्दा उपस्थित केला. त्यापाठोपाठ सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्ष नेते मिलींद पाटील आणि भाजप गटनेते मिलींद पाटणकर यांनी कर वसुली तात्काळ थांबविण्याची मागणी केली. मालमत्ता करामध्ये साफसफाई शुल्क आकारले जात असताना घनकचरा सेवा शुल्कचा अतिरिक्त कर कशासाठी, असाही सर्वपक्षीय नगरसेवकांनी मुद्दा यावेळी उपस्थित केला. तसेच या कराच्या वसुलीसाठी देण्यात आलेल्या नोटीसा मागे घ्याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली. परंतु महासभेने केलेल्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसून हा ठराव प्रशासकीय पातळीवर विचारधीन असल्याचे मत उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाTaxकर