शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांवर कोसळणार करवाढीची कु-हाड, ५०० चौरस फूट घरांच्या करमाफीकडे सर्वांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 00:08 IST

आयुक्त आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांतील वादामुळे लांबणीवर पडलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रशासनाने अखेर ११ मार्च रोजीचा मुहूर्त शोधला आहे.

ठाणे : आयुक्त आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांतील वादामुळे लांबणीवर पडलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी प्रशासनाने अखेर ११ मार्च रोजीचा मुहूर्त शोधला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी वैद्यकीय रजेवर जाणार असल्याचे घोषित केल्यानंतर बुधवारी प्रशासनाने अर्थसंकल्प सादर करण्याचे स्पष्ट केले. यात ठाणेकरांवर करवाढीची कुºहाड कोसळणार असून जुन्या प्रकल्पांना गती देऊन काही नवीन प्रकल्पांची घोषणादेखील केली जाणार आहे. ठाणेकरांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे.आयुक्त आणि अधिकारी यांच्यात व्हॉट्सअ‍ॅपवर झालेल्या वादाचे पडसाद चांगलेच उमटले होते. त्यामुळे अर्थसंकल्प लांबणीवर जाणार असल्याची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु, आयुक्तांनी मंगळवारी बंगल्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी आपण वैद्यकीय रजेवर जात असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आता त्यांचा कार्यभार अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार आता येत्या ११ मार्च रोजी ठाणेकरांसाठी ते २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच प्रकल्पांची री ओढण्यात आली आहे. पालिकेवर तीन हजार कोटींचे कर्ज असल्याने अर्थसंकल्पात जुन्याच प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे. यामध्ये स्मार्ट सिटीमधील अर्धवट प्रकल्प पूर्ण करणे, चौपाट्यांचा विकास, जलवाहतूक, नवीन ठाणे स्टेशन, क्लस्टर, कोपरी ईस्ट, सॅटिस यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.>अंतर्गत मेट्रोऐवजी लाइट रेलचा विचारदुसरीकडे अंतर्गत मेट्रोला केंद्र सरकारने नकार दिल्याने पालिकेने पुन्हा लाइट रेलचा विचार सुरू केला आहे. त्या अनुषंगाने त्याचाही उल्लेख यात असणार आहे. दुसरीकडे ठाणेकरांवर यंदा पुन्हा करवाढीची कुºहाड कोसळणार आहे. पाण्याच्या करात ४० ते ५० टक्के करवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिवहनच्या तिकीटदरातही २० टक्के दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच इतर काही करांमध्येही वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. असे असले तरी यंदाचाही अर्थसंकल्प हा शिलकी असणार, हेदेखील आता स्पष्ट होत आहे.