शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सेना नगरसेवकाला मारण्याची उल्हासनगरात सुपारी

By admin | Updated: January 11, 2017 07:05 IST

शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक विजय पाटील यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी केला असून

उल्हासनगर : शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक विजय पाटील यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक प्रधान पाटील यांनी केला असून त्याबाबत चौकशीचे पत्र त्यांनी पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त व अंबरनाथ पोलीस ठाण्याला दिले आहे. उल्हासनगरच्या प्रभाग ३९ मधून शिवसेनेच्या तिकिटावर प्रधान पाटील निवडून आले. त्याच प्रभागातून त्यांच्या भावाची सून अपेक्षा पाटील निवडून आल्या असून त्या महापौर आहेत. १० डिसेंबरला संध्याकाळी प्रधान पाटील यांना मनोज ठाकूर, प्रकाश भंडारी व शकील खान यांच्या नावाने ठार मारण्याीच धमकी देणारा फोन आला. ज्यांच्या नावे धमकी आली त्यांच्याशी घरोब्याचे संबंध असल्याने प्रधान यांनी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी आमच्या नावाचा वापर केल्याचा खुलासा केला. त्यामुळे हिललाईन पोलीस ठाण्यात प्रधान यांनी तक्रार केली. त्यानंतर २३ डिसेंबरला त्यांना शंकर चौहान नावाची व्यक्ती भेटली. तुमचा नातलग व नगरसेवक विजय पाटील यांनी तुम्हाला ठार मारण्याची सुपारी सलमान भाई याला दिल्याची माहिती त्याने प्रधान यांना दिली. हे शूटर मुंब्रा व भिवंडी येथे राहणारे असल्याचा तपशीलही पुरवला. या व्यक्ती नेताजी प्रभाग गार्डनमध्ये आल्या होत्या आणि त्यांनी प्रधान बॅडमिंटन खेळण्यासाठी कधी येतात त्याची चौकशी केल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाला धोका असल्याचे सांगत या प्रकाराची चौकशी करण्याचे पत्र त्यांनी पोलिसांना दिले. संरक्षण पुरवण्याची मागणीही त्यांनी अंबरनाथ पोलिसांकडे केली. (प्रतिनिधी)