शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय ठरला ‘महाराष्ट्रकुमार’चा मानकरी; सलग दुसऱ्यांदा मिळविले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 00:43 IST

बंगळुरूमधील भारत कुमार स्पर्धेसाठी झाली निवड

सचिन सागरे कल्याण : चिपळूण येथे रविवारी झालेल्या ७० व्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव निवड चाचणी स्पर्धेत कुमार गटात कल्याणचा अक्षय कारभारी ‘महाराष्ट्रकुमार’चा मानकरी ठरला आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये बंगळुरू येथे होणाºया ‘भारत कुमार श्री’साठी त्याची निवड झाली आहे.चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ३५० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत एकापेक्षा एक पोज देत अक्षयने उपस्थितांची मने जिंकली. सलग दुसऱ्यांदा अक्षयने ‘महाराष्ट्रकुमार’ पदकावर आपले नाव कोरले आहे. पश्चिमेतील उंबर्डे गावातील हिºयाचापाडा येथे राहणाºया अक्षयने वडिलांना कुस्ती खेळताना पाहून इयत्ता तिसरीत असताना कुस्ती खेळायला सुरुवात केली. दहावीपर्यंत जिल्हास्तरीय कुस्ती खेळल्यानंतर आवड म्हणून २०१४ पासून व्यायामशाळेत जाण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये पहिल्यांदा शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेणाºया अक्षयने ‘ठाणे किशोर’चा किताब पटकावला. त्यानंतर, ‘महाराष्ट्र किशोर श्री’साठी निवड झालेल्या स्पर्धेत अक्षयने सुवर्णपदक पटकावले. शरीरसौष्ठव स्पर्धेत कमी कालावधीमध्ये अक्षयने दोनदा ‘ठाणे कुमार’ पटकावण्याबरोबरच ‘ठाणे किशोर’, ‘ठाणे महापौर श्री’, ‘कल्याण श्री’, ‘मावळी मंडळ श्री’ किताब पटकावले आहेत. त्याचप्रमाणे, ‘भारत किशोर’मध्ये सुवर्णपदक पटकावत किताब उपविजेता ठरला आहे. आतापर्यंत अक्षयने नऊ किताबांसह एक उपविजेतेपद पटकावले आहे.

महाराष्ट्र अ‍ॅम्युचर बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनिल वझे यांच्या देखरेखीखाली किशोर ऊर्फ अण्णा शेट्टी यांच्या डोंबिवलीतील व्यायामशाळेत सध्या सहा ते सात तास व्यायामाचा सराव करत असल्याचे अक्षयने सांगितले. शरीरसौष्ठव स्पर्धा आव्हानात्मक असल्याने दरमहिन्याला डाएट बदलले जाते. मेहनत केल्यास आपल्याला हमखास यश मिळते, असेही सांगायला अक्षय विसरत नाही.‘मिस्टर एशिया’चे ध्येयमिस्टर एशिया हा किताब मिळवणे अक्षयचे स्वप्न आहे, त्यासाठी तो सध्या खूप मेहनत घेत आहे. त्याचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांबरोबरच त्याच्या कुटुंबीयांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे.