शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अखाद्य बर्फाची शहरात सर्रास विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 04:25 IST

आरोग्यास हानिकारक : अन्न औषध प्रशासनाचे दुर्लक्ष; बर्फाचा गोळा, सरबताचाही धोका

डोंबिवली : औद्योगिक उपयोगासाठी वापरला जाणारा बर्फ हा अखाद्य प्रकारात मोडतो. मात्र, या बर्फाचा वापर सरबत आणि रसविक्री करणाऱ्या दुकानांतून सर्रासपणे केला जातो. त्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या खात्याचे दुर्लक्ष होते आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि ग्रामीण भागात अखाद्य बर्फाचा वापर केला जात आहे. अखाद्य बर्फ हा आरोग्यास हानिकारक आहे.कल्याण आणि डोंबिवली तसेच अन्य आसपासच्या रेल्वेस्थानकांत लिंबूसरबत तयार करणाºया गाड्यांवर अखाद्य बर्फ सर्रासपणे वापरला जातो. त्याचबरोबर रसवंतीगृहातदेखील याच बर्फाचा वापर होतो. अनेक हातगाड्यांवर बर्फाचा गोळा तयार केला जातो. तो याच बर्फाच्या साहाय्याने. त्यावर रंग टाकून तो रंगीबेरंगी गोळा खाण्यास दिला जातो. हा अखाद्य बर्फ खाण्यासाठी नसून औद्योगिक कारखान्यात उत्पादने टिकवून ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो.कल्याण-डोंबिवली परिसरात आइस फॅक्टरी आहे. त्यात हा बर्फ तयार केला जातो. तो कारखान्यांसाठी वापरला जाणे क्रमप्राप्त आहे. मात्र, त्याच बर्फावर रसवंतीगृहे, गोळ्यांच्या गाड्या आणि लिंबूसरबताचा व्यवसाय चालतो. अखाद्य बर्फापासून तयार केलेली सरबते, बर्फाचे गोळे हे आरोग्यास हानिकारक आहेत. अखाद्य बर्फ हा अशुद्ध पाण्यापासून तयार केला जातो.या अखाद्य बर्फाचा वापर टाळण्यासाठी राज्य सरकारने एक अध्यादेश काढला आहे. १ जूनपासून अखाद्य बर्फाचा रंग निळा असावा, असे त्यात आदेशित करण्यात आलेले आहे. त्यामुळे अखाद्य बर्फ तयार करणारे कारखाने १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करतात की नाही, हे महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी अन्न आणि अ‍ौषध प्रशासनाकडून अखाद्य बर्फाचा वापर करणाºयांवर काहीच कारवाई केली जात नाही, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले आहे. १ जूनपासून अखाद्य बर्फाला निळा रंग दिल्याने तो ओळखता येणार असला, तरी तो बाजारात विकला जाऊ नये, यासाठी सरकारी यंत्रणा काय कारवाई करणार, याविषयी अस्पष्टता दिसते आहे.

टॅग्स :foodअन्न