शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती पूर्व परीक्षेत अजय प्रथम

By admin | Updated: April 24, 2017 02:20 IST

ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रांतर्गत टोकावडे पोलीस ठाण्यामार्फत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला

मुरबाड : ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रांतर्गत टोकावडे पोलीस ठाण्यामार्फत मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला यश आले असून नुकत्याच झालेल्या भरती पूर्व परीक्षेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेतून रामपूर येथील अजय जावळे हा पहिला आला असून त्याला २०० पैकी १८२ गुण मिळाले. हे प्रशिक्षण सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय धुमाळ देत आहेत.टोकावडे पोलीस ठाण्यांतर्गत येणारा बहुतांश विभाग मागास क्षेत्र असून येथे अनुसूचित जातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथील तरुण जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण घेतात, तेही शासकीय आश्रमशाळा आसपास असल्यामुळे. त्यामुळे अनेक आदिवासी, गोरगरिबांची मुले अर्धवट शिक्षणामुळे नोकरी-धंद्यापासून वंचित राहतात. मात्र, दोनच वर्षांपूर्वी टोकावडे पोलीस ठाण्यातील अधिकारी पंकज गिरी आणि विजय धुमाळ यांनी या तरुणांना भरपूर मेहनत घेऊन पोलीस व्हा, असा सल्ला दिला. केवळ एवढेच नाही, तर दोन वर्षांपासून टोकावडे व परिसरात मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू केले. उपनिरीक्षक विजय धुमाळ स्वत: या मुलांना पहाटे ५ पासून प्रशिक्षण देतात. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून धसई परिसरातून रामपूर येथील अतिशय गरीब घरातील अजय जावळे नवी मुंबई तुरुंगासाठी झालेल्या पोलीस भरतीत अनुसूचित जागेतून २०० पैकी १८२ गुण मिळवून पहिला आला, तर मोहन खंडवी हा पालघर पोलिसांत भरती झाला. (वार्ताहर)