शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवात, ठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 15:48 IST

ठाण्यात अनेक महाविद्यालये आणि विविध ठिकाणी कवितांचे कार्यक्रमे गेल्यानंतर आगरायन या मैफलीने बोलीभाषा जतनाच्या उद्देषार्थ महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरविले आहे. 

ठळक मुद्देआगरायनच्या महाराष्ट्र दौऱ्यास सुरुवातठाण्यातील उपक्रम आता महाराष्ट्रभर महाराष्ट्र दौर्यातील पहिला प्रयोग रायगड मधील म्हसळ्यात

ठाणे :  ठाणे,पालघर,मुंबई येथे विविध ठिकाणी २८ आगरायन काव्यमैफलीचे प्रयोग केल्यानंतर महाराष्ट्र दौर्यातील पहिला प्रयोग रायगड मधील म्हसळ्यात पार पडला. प्रस्तुत प्रयोग म्हसळा पंचायतीच्या गटशिक्षक अधिकारी गजानन साळुंखे यांनी आयोजीत केला होता. आगरायनच्या या मैफलीत विविध बोलीतील कवितांचे सादरीकरण झाले.

कार्यक्रमाची सुरवात प्रकाश पाटील यांनी गाण्याच्या तालावर गणेशाच चित्र रेखाटुन केली आणि नैतिकतेवर आधारीत ‘मी ज बोल्लु त माझा तोंड दिसतं’ ही आगरी कविता सादर केली. त्यानंतर सुमेध जाधव यांनी कवीच्या मनाच्या भावना व्यक्त करीत ‘रुदाली’ ही हिंदी कविता सादर केली. कवी दीप पारधे यांनी गड्ड किल्ले या ऐतिहासिक वास्तुंची आपण केलेली दुर्देशा आपल्या ‘महाराज’ या कवितेतून सांगीतली. सर्वेश तरे यांनी मराठी प्रेम कविता सादर करीत देशप्रेमावरील ‘पाकिस्तान कवरा आमचे ठान्या आवरा’ ही कविता सादर केली. मोरेश्वर पाटील यांनी धुरांडा ही एकोपा राखण्याचे आवाहन करणारी आगरी कविता सादर केली.गजानन पाटील यांनी शिक्षणाचे महत्व सांगणारी आगरी कविता सादर केली. त्याचबरोबर मैफलीत मालवणी,वैदर्भीय,मराठवाडी,हिंदी बोलीतील कविताही सादर झाल्या. प्रस्तुत कार्यक्रम खास म्हसळा तालुक्यातील शिक्षक वर्गासाठी घेण्यात आला होता तसेच कार्यक्रमात २०० हून अधिक शिक्षकांची उपस्थिती होती. म्हसळा पंचायच समितीचे सभापती उज्वला सावंत, उपसभाती मधुकर गायकर,पंचायत समिती सदस्या छाया म्हात्रे आदी मान्यवर आदींची शेवट पर्यत उपस्थित होते. आगरायन दीड तासंचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आग्रहाने यंदा तीन तासांचा झाला. पुढील आगरायन चा महाराष्ट्र दौरा आकाशवाणी मुंबई तसेच कोल्हापुरला होणार असल्याचे आगरायनचे प्रमुख गजानन पाटील यांनी सांगीतले.   बोली भाषा जतन व्हावी तिचा दैनंदिन जीवनाज वाढावा व्हावा या उद्देशाने ठाण्यातील कवी गजानन पाटील,सर्वेश तरे तसेच प्रकाश पाटील यांनी आगरायन काव्य मैफील सुरू केली. या मैफलीचा प्रारंभ ठाण्यातील बी एन बांदोडकर येथुन झाला आणि बघता बघता मैफलीचे ठाण्यात मोह विद्यालय,ज्ञानसाधना तसेच विविध ठिकाणी एका वर्षात २५ प्रयोग झाले. आता ठाण्यातील विविध प्रयोगानंतर कवी गजानन पाटील,सर्वेश तरे आणि प्रकाश पाटील यांनी मैफलीचा महाराष्ट्र दौरा करण्याचे योजले असुन याचा पहिला दौरा रायगड मधील म्हसळा तालुक्यात दि १३ जुन रोजी संपन्न झाला.

टॅग्स :thaneठाणेRaigadरायगडcultureसांस्कृतिक