शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशींना ओळखपत्रे पुरवणारा एजंट अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 02:31 IST

बांगलादेशींना भारतीय ओळखपत्रे पुरवणाऱ्या एका एजंटला एटीएसने बेड्या ठोकल्या. भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक केली होती.

अंबरनाथ : बांगलादेशींना भारतीय ओळखपत्रे पुरवणाऱ्या एका एजंटला एटीएसने बेड्या ठोकल्या. भारतात बंदी घालण्यात आलेल्या बांगलादेशी संघटनेच्या एजंटला एटीएसने अंबरनाथमधून अटक केली होती. या प्रकरणाचा तपास सुुरू असतानाच नवी मुंबई एटीएसला या एजंटबाबत माहिती मिळाली होती. त्याने बांगलादेशी नागरिकांना पॅन कार्ड तयार करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातून बनावट प्रतिज्ञापत्र मिळवल्याचा आरोप आहे. अंबरनाथमधील काही एजंट बांगलादेशी नागरिकांना भारतातील ओळखपत्र तयार करून देण्यासाठी मदत करत असल्याचा सुगावा लागल्याने ही कारवाई करण्यात आली.एटीएसने अंबरनाथमधून बांगलादेशी संघटनेशी संबंधित असलेल्या आणि मूळच्या बांगलादेशचा रहिवासी असलेल्या आरोपीला अंबरनाथमधून अटक केली होती. त्यातूनच अंबरनाथमध्ये बांगलादेशी पाळेमुळे रोवत असल्याचे समोर आले होते. बांगलादेशी आरोपींकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड सापडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबई एटीएसनेही अंबरनाथमध्ये कारवाई केली. पॅन कार्ड आणि आधार कार्ड काढण्यासाठी लागणारे प्रतिज्ञापत्र चुकीच्या मार्गाने मिळविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. काही बांगलादेशी नागरिकांनी पॅन कार्ड तयार करण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातून बनावट प्रतिज्ञापत्र मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एटीएसने गुन्हा दाखल करत ८३ प्रतिज्ञापत्रधारकांची यादी मागवत प्रवीण पाटील या एजंटला अटक केली आहे.महिनाभरापूर्र्वी मुंबई येथून बांगलादेशी संघटनेच्या काही लोकांना अटक करण्यात आली होती. त्याचे धागेदोरे नवी मुंबईत कामोठे येथे सापडल्याने तेथूनही आठ ते दहा बांगलादेशी कामगारांना एटीएसने ताब्यात घेतले होते. मात्र याच तपासात पॅन कार्ड तयार करण्यासाठी काही बांगलादेशी नागरिकांनी एका एजंटमार्फत अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या सेतूमधून बनावट अ‍ॅफिडेव्हिट तयार केल्याचे समोर आले. या प्रकरणी नवी मुंबई एटीएस युनिटने अंबरनाथ तहसील कार्यालयाच्या सेतू कार्यालयातून ८३ अ‍ॅफिडेव्हिट ताब्यात घेतले. याच प्रकरणात प्रवीण पाटील या एजंटला अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात सेतू कार्यालयातील तीन लिपिकही संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. त्यांना तहसीलदारांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच त्यांच्या कामाचा अहवाल एटीएसला पाठवण्यात येणार असून, त्यांची एटीएसमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे एजंट आणि सेतू कार्यालयातील कर्मचाºयांतील संबंधाचा फायदा घेत बांगलादेशी नागरिकांना पॅन कार्ड काढण्यासाठी मदत केली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येत्या काही दिवसात काही बांगलादेशींच्या बनावट ओळखपत्रांबाबत मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. याबाबत एटीएसच्या नवी मुंबई युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना विचारले असता, प्रवीण पाटील याला अटक करण्यात आल्याचे सांगितले.