शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आगरी महोत्सव समाजाभिमुख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:28 IST

काळू कोमास्कर यांचा आरोप : हिशेबही दिला नाही, आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह

कल्याण : आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीतील क्रीडासंकुलात १५ वर्षांपासून आगरी महोत्सव भरवण्यात येत आहे. मात्र, हा महोत्सव समाजाभिमुख नाही. या महोत्सवाच्या नावाखाली गोळा करण्यात येणाऱ्या पैशांचा हिशेबही दिला जात नाही, असा मुद्दा आगरी समाजाचे व डोंबिवली लालबावटा रिक्षा युनियनचे प्रमुख काळू कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे. कोमास्कर यांनी याविषयी मंगळवार, २७ नोव्हेंबरला समाजबांधवांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या आरोपामुळे आगरी महोत्सवाच्या आयोजनाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घरगुती उत्पादनांना बाजारपेठ, समाज-संस्कृतीचे संवर्धन, वैचारिक व्यासपीठ देणे, या उद्देशाने आगरी युथ फोरमने आगरी महोत्सवाला सुरुवात केली. महोत्सवासाठी विशेषत: त्यात सहभागी होणाºया व्यावसायिक स्टॉल्सकडून भाडे आकारले जाते. परंतु, महोत्सवासाठी समाजाने दिलेल्या निधीचा उपयोग हा समाजासाठीच झाला पाहिजे. हा पैसा आयोजन संस्थेचा नसून तो समाजाचा आहे. या निधीचा १५ वर्षांत हिशेब दिला गेलेला नाही, असा मुद्दा कोमास्कर यांनी उपस्थित केला आहे.

आगरी महोत्सव समाजाभिमुख असायला हवा. एखादी व्यक्ती अथवा संस्थेचा नसावा, याकडे कोमास्कर यांनी लक्ष वेधले आहे. आगरी समाजाचे नाव घेऊन एखादी व्यक्ती आपले स्वत:चे नाव मोठे करत असेल तसेच एखादी संस्था हा महोत्सव स्वत:ची मक्तेदारी समजत असेल, तर त्याला समाजाचा विरोध आहे, असे सांगून कोमास्कर यांनी आगरी युथ फोरम व त्याचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यावर निशाणा साधला आहे. महोत्सवाच्या समितीत समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जात नाही. वेगवेगळ्या तालुक्यांतील आगरी समाजबांधवांना सामावून घेतले जात नाही, असे मुद्देही कोमास्कर यांनी मांडले आहेत.

दरम्यान, या सर्व मुद्यांवर विचारविनिमय करण्यासाठी निळजे येथील ज्येष्ठ नागरिक भवनात २७ नोव्हेंबरला सायंकाळी ५ ते ७ दरम्यान बैठक होणार आहे. यावेळी माजी आमदार, मनसेचे नेते, केडीएमसीचे नगरसेवक, युवा मोर्चासह विविध गावांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या सगळ्यांची त्यांना कल्पना देऊनच ही बैठक बोलावल्याचे कोमास्कर म्हणाले.

महोत्सवाचे होते लेखापरीक्षण - वझेआगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे म्हणाले, ‘आगरी युथ फोरमतर्फे भरवल्या जाणाºया आगरी महोत्सवाच्या जमाखर्चाचे लेखापरीक्षण केले जाते. त्यात, लपवाछपवी होत नाही. एका भाजपा नेत्याच्या पुढाकाराने महोत्सव भरवला जातो. त्याची समाजकार्यास मदत होत आहे. हीच पोटदुखी कोमास्कर यांना आहे. महोत्सव समाजाभिमुख नसल्याचा त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. पंधरा दिवसांपूर्वीच महोत्सव भरवण्यासाठी बैठक घेऊन विविध समाजांतील मान्यवरांच्या सूचना विचारात घेतल्या आहेत. दरवर्षी अशी बैठक घेतली जाते. चांगले व यशस्वी आयोजन हेच विरोधकांच्या डोळ्यांत खुपत असल्याने त्यांनी विविध निराधार मुद्दे उपस्थित करून आयोजनावर बोट ठेवले आहे. हे चुकीचे आहे.’