शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

पुन्हा पाणी पेटले!

By admin | Updated: January 8, 2016 02:06 IST

अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक गाजली. तेव्हा कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी पालिकांसह २७ गावांच्या

ठाणे : अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे गुरुवारी ठाणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक गाजली. तेव्हा कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी पालिकांसह २७ गावांच्या पाणीपुरवठ्याचे सुमारे पाच कोटी रुपयांचे बिल थकल्याचा गौप्यस्फोट एमआयडीसीने केला आणि ही बैठक वादळी ठरली. जिल्ह्यातील प्रमुख शहरांची लोकसंख्या वाढत असून तेथे सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी जादा पाण्याची गरज असल्याचा आणि त्यासाठी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी मांडला. सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील आमदार आक्रमक झाले होते. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना महापालिकांकडे पाणीपट्टीची मोठी रक्कम थकीत असल्याचे एमआयडीसीने उघड केले. तरीही, एकाही गावाचा किंवा शहराचा पाणीपुरवठा तोडलेला नाही, हेही निदर्शनास आणले. सद्य:स्थितीत या महापालिकांना दररोज सुमारे ६५० एमएलडी सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचा दावाही एमआयडीसीने केला. महानगरांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणीपुरवठ्याच्या गरजेवरही या वेळी चर्चा झाली.कोणत्याही शहराचा किंवा गावाचा पाणीपुरवठा बंद नाही. तोडलेला नाही, असे उत्तर एमआयडीसीकडून मिळताच कल्याण-डोंबिवली परिसरातील लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा खोडून काढला. कल्याण पूर्वेतील कमी दाबाच्या पाण्याचा मुद्दा गणपत गायकवाड यांनी लक्षात आणून दिला.२७ गावांतील गावकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोपही लोकप्रतिनिधींनी केला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही पाणी तोडले नसल्याचे उत्तर दिले. पाणी स्रोत वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कल्याण- शहराच्या पूर्व भागातील नेतिवली परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी टंचाई असल्याच्या निषेधार्थ संतप्त नागरीक रस्त्यावर उतरले. त्यांनी कल्याण शीळ रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. नेतिवली परिसराचा पाणी पुरवठा एमआयडीसीने कल्याण डोंबिवली महापालिकेस सांगूनच बंद केला होता. त्यामुळे नेतिवली परिसराला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे असे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकेकडून एमआयडीसीकडे बिलाच्या पोटी पाच कोटी येणे आहे.एमआयडीसीचे कार्यकारी अभियंका सुरेश जगताप यांनी सांगितले की, या लाईनवरुन नेतिवली परिसराला एमआयडीसीकडून ०.३ दश लक्ष लिटर पाणी पुरवठा केला जात होता. हा पाणी पुरवठा महापालिकेस केला जात होता. महापालिकेकडून पाणी नागरीकांना पुरविले जात होते. त्यामुळे पाण्याचे नियोजन महापालिकेने करावे हे उघड आहे. या लाईनवर एमआयडीसीला पाणी ग्राहक नाही. त्यामुळे नेतिवलीचे पाणी पुरवठा करणारे कनेक्शन एमआयडीसीने बंद केले आहे. पाणी पुरवठा बंद करताना महापालिकेस सांगितले होते. शहापूरसाठी १६० कोटींचे माऊली धरणठाणे : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्याची पाणीटंचाई संपवण्यासाठी कर्जत तालुक्यात माऊली धरण बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी १६० कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांनी सांगितले. या धरणाचा सर्वाधिक म्हणजे ८० टक्के लाभ शहापूर तालुक्यातील गावांना होणार आहे. पुढील २५ वर्षांसाठी होणारा पाणीपुरवठा लक्षात घेऊन या धरणाचे काम हाती घेतल्याचे चौधरी यांनी सांगितले. पण सत्ता कोणाचीही असू दे, या धरणाचे काम मीच करणार, असे फलक आमदार पांडुरंग बरोरा यांनी लावल्याचे खासदार कपिल पाटील यांनी निदर्शनास आणले. त्या धरणासाठी मी आधीपासून झटत असल्याचा दावा त्यांनी केला. आपण सर्व मिळून श्रेय घेऊ, असे सांगून बरोरा यांनी विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. या धरणाला मंजुरी मिळाली तर शाई धरणाला अडचण येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.