शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

अवमान याचिकेच्या बाताच!, फेरीवालाविरोधी पथक, ‘मनसे’ही थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 04:00 IST

उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे.

- प्रशांत माने डोंबिवली : उच्च न्यायालयाने फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. केडीएमसी हद्दीतील अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांवर इतरत्र कारवाई सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरात मात्र फेरीवाल्यांची मुजोरी कायम आहे. यात महापालिकेच्या पथकांसह फेरीवाला हटवण्यासाठी आग्रही असलेली मनसेही थंड पडल्याचे चित्र आहे. केडीएमसीविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मनसेची घोषणा अद्यापही कागदोपत्रीच राहिली आहे. त्यामुळे ठोस कृतीअभावी अवमान याचिकेची मनसेची वल्गना केवळ ‘बाता’ च ठरली आहे.महापालिका पर्यायी जागा देत नाही, तोपर्यंत स्थानक परिसरातच व्यवसाय करणार, असा पवित्रा फेरीवाल्यांनी घेतला आहे. इतर ठिकाणी फेरीवाला हटाव कारवाई जोमाने सुरू असताना डोंबिवली पूर्वेकडील भागात फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम आहे. ते हटविण्यात स्थानिक प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्यात हयगय करणाºया नऊ कर्मचाºयांना आयुक्त पी. वेलरासू यांनी निलंबित केले होते. वेलरासू यांनी डोंबिवलीतही फेरफटका मारून वास्तव पहावे, अशी मागणी होत आहे.फेरीवाल्यांची मुजोरी इतकी वाढली आहे, की पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी हुज्जत आणि त्यांना धक्काबुक्की करण्याचे प्रताप फेरीवाल्यांकडून वारंवार घडत आहेत. मात्र, फेरीवाला हटवण्याची कारवाई प्रभावीपणे होत नसल्याने मनसेने आयुक्त वेलरासू यांना अवमान नोटीस बजावली आहे. मनसेने डोंबिवली, ठाकुर्ली आणि कोपर रेल्वेस्थानक प्रबंधकांनाही सूचना पत्र देऊन यापुढे जर फेरीवाले हटवले नाहीत अथवा तुमच्या कामात हयगय केल्याचे आढळल्यास आपणावर अवमान याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही दिला आहे. परंतु, अवमान याचिकेची नोटीस देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने केडीएमसीविरोधात आठवडाभरात अवमान याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे भाष्य मनसेचे महापालिकेतील विरोधीपक्षनेते मंदार हळबे यांनी जानेवारीत केले होते. आमच्याकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवक रच याचिका दाखल केली जाईल, असेही ते म्हणाले होते. परंतु, अद्यापही याला मुहूर्त मिळालेला नाही. याबाबतची अधिक माहिती घेता कायदेशीर प्रक्रिया अद्याप सुरू असल्याची माहिती मिळत आहे.एकीकडे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाला अतिक्रमणाचे चित्र दिवसागणिक बकाल होत असताना दुसरीकडे मनसेच्या थंड पवित्र्याबाबतच शंका उपस्थित होत आहे. ‘डोंबिवली हे घाणेरडे शहर आहे,’ असे वक्तव्य नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. याबाबत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर तोंडसुख घेण्यात विरोधीपक्ष मनसेने कुठलीही कसर ठेवली नसताना फेरीवाला अतिक्रमणावर अवमान याचिका दाखल करण्याबाबत इतकी उदासीनता का?, असा सवाल केला जात आहे. याप्रकरणात मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाºयांची बोटचेपी भूमिकाही तितकीच कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे.>लवकरच याचिकाया संदर्भात मनसे कल्याण जिल्हा चिटणीस प्रकाश माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फेरीवाला अतिक्रमणावर ठोस तोडगा निघण्याच्या दृष्टीने आम्ही काही कागदपत्रांची जमवाजमव करत आहोत. बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही बाबींची पूर्तता व्हायची आहे. ती देखील लवकरच पूर्ण होऊन येत्या चार ते आठ दिवसांत अवमान याचिका दाखल केली जाईल, असा दावा त्यांनी केला.