शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रुंदीकरणानंतर वाढीव बांधकाम केलेल्या वाणिज्य गाळेधराकांकडून रेडी रेक्नरनुसार भुईभाडे वसुल करणार ठाणे महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 15:11 IST

शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता ठाणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणातील वाणिज्य गाळेधारकांना नोटीसा बजावण्याची मोहीम हाती घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार या गाळेधारकांकडून रेडीरेक्नर नुसार भाडे वसुल केले जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या दोन दिवसात नोटीसा बजावण्यास सुरवात१५० गाळेधारकांचा सर्व्हे झाला पूर्ण

ठाणे - ठाण्याच्या विविध भागात रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. विस्थापितांच्या विरोधाशिवाय ठाणे शहरात रस्ता रुंदीकरणाची मोहीम पार पडली. परंतु या रस्ता रुंदीकरणानंतर आता या रस्त्याच्या बाजूलाच अनेक वाणिज्य गाळेधारकांनी पालिकेची परवानगी न घेता, वाढीव बांधकाम केले आहे. त्यामुळे आता शासकीय जागेत वाढीव बांधकाम केल्याने आता त्यांच्याकडून रेडी रेक्नरनुसार भूईभाडे वसुल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार अशा वाणिज्य वापराच्या गाळेधारकांचा सर्व्हे पालिकेकडून सुरु झाला असून येत्या एक ते दोन दिवसात त्यांना नोटीसा बजावल्या जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.               ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्फत मागील काही महिन्यांपासून शहरातील विविध भागातील रस्त्यांचे रुंदीकरणाची मोहीम राबविली जात आहे. पोखरण रोड क्र मांक एकच्या रस्त्यावर तर अनेक व्यावसायीक गाळे आणि इमारतींवर कारवाई करून एवढा प्रशस्त रस्ता करताना कुठेही वाद उद्भवला नाही. या रस्त्या बरोबरच पोखरण २, तीन, सर्व्हीस रस्ते, ठाणे स्टेशन परिसरातील गजबजलेला मार्केट परिसर रस्ता, शास्त्री नगर, हत्तीपुल रस्ता, कळवा, मुंब्रा आदी भागातील रस्त्यांचे पालिकेने रुंदीकरण केले.                  एकूणच या सर्वच रुंदीकरणाच्या कारवाई करीत असतांना पालिकेला कोणत्याही प्रकारची अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली नाही. परंतु आता रस्ता रुंदीकरणानंतर काही वाणिज्य गाळेधराकांनी त्याच रस्त्यांमध्ये शिल्लक राहिलेल्या गाळ्यांवर वाढीव बांधकाम केले आहे. ते नियमाला धरुन नसल्याचे पालिकेचे म्हणने आहे. या व्यावसायिक गाळेधारकांकडून पालिका केवळ मालमत्ता कराचीच वसुली करीत आहे. परंतु आता त्यांच्याकडून भुई भाडे देखील वसुल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. संबधींत गाळेधारकांनी शासकीय जागेत बांधकाम केले असल्याने नियमानुसार आता त्यांच्याकडून रेडी रेक्नरनुसार भाडे वसुल केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार आतापर्यंत १५० गाळेधारकांचा सर्व्हे पूर्ण झाला असून अद्यापही हा सर्व्हे सुरुच आहे. त्यामुळे हा आकडा एक हजारांच्या आसपास किंवा त्याहीपेक्षा वाढण्याची चिन्हे असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यांच्याकडून आता एकदाच रेडीरेक्नरनुसार भुई भाडे वसुल केले जाणार संबधींतांना नोटीस बजावण्याची कारवाई येत्या एक ते दोन दिवसात सुरु होईल अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त