शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बदलीनंतर अधिकाऱ्यांच्या दालनातील सीसीटीव्ही बंद

By admin | Updated: May 26, 2017 00:03 IST

महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक होण्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यालयासह अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : महापालिकेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक होण्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मुख्यालयासह अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. मात्र त्यांची बदली होताच बहुतांश अधिकाऱ्यांच्या केबिनमधील कॅमेरे बंद झाले. अथवा त्यांची तोंडे छताकडे फिरविली आहेत. याप्रकाराबाबात आयुक्त सुधाकर शिंदे यांनी नाराजी व्यक्तकरत कारवाई संकेत दिले आहे.उल्हासनगर महापालिका विभागातील सावळागोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी व स्वच्छ पारदर्शक कारभार होण्यासाठी निंबाळकर यांनी मुख्यालय परिसरासह अधिकारी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. आयुक्तांच्या दालनात याचे नियत्रंण ठेवल्याने त्यांना कोणत्या दालनात काय काम सुरू आहे याचे थेट चित्र दिसत होते. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामाच्यावेळी लिपीक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत नसल्याने कारणे दाखवा नोटीस बजावत अर्धा दिवसाचे वेतन कापले होते. आयुक्त निंबाळकर यांची पनवेल महापालिकेत बदली होताच, बहुतांश अधिकारी यांनी दालनामधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. अथवा त्यांची तोंड छताकडे वळवली. त्यामुळे दालनातील काहीही चित्रीत होत नाही. पालिका अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून स्वच्छ व पारदर्शक कारभाराला फाटा दिल्याची टीका होत आहे. अतिरीक्त आयुक्त विजया कंठे, मुख्य लेखाअधिकारी दादा पाटील, शहर अभियंता राम जैस्वाल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शितलानी, जनसंपर्क अधिकारी कार्यालय यांच्यासह अनेक कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अथवा त्यांची तोंड छताकडे वळवली आहेत. तर काही अधिकाऱ्यांनी दंबंगगिरीचा वापर करत सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे उघड झाले. ज्या अधिकाऱ्यांच्य दालनातील कॅमेरे बंद आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. तत्कालिन आयुक्तांच्या निर्णयाला हरताळ फासल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने महासभा, स्थायी समिती सभागृह, महापौर, उपमहापौर यांच्यासह गटनेता, विरोधीपक्ष नेत्यांच्या दालनातही कॅमेरे बसवण्याची मागणी केली जात आहे.