शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात रस्ता सफाई पाठोपाठ मेट्रो गर्डर टाकणारी क्रेन 'ही' निघाली गुजरात पासिंगचीच! 

By अजित मांडके | Updated: September 23, 2023 16:02 IST

ठाणे महापालिकेने ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी एकूण सहा सफाई यंत्र गाड्या घेण्यात येणार असून त्यापैकी दोन गाड्या महापालिकेच्या ताफ्यात काही महिन्यांपूर्वी दाखल झाल्या आहेत.

ठाणे : नुकतेच ठाणे महापालिका मार्फत शहरातील महत्वाचे रस्ते सफाईसाठी मागवलेल्या काही गाड्या गुजरात पासिंगच्या असल्याचे धक्कादायक बाब समोर आली होती. हे होत नाही तोच आता एमएमआरडीएमार्फत ठाणे शहरात मेट्रोचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. त्या कामासाठी मागवलेली महाकाय क्रेनची गाडी ही गुजरात पासिंगची असल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात गुजरातमधील ठेकेदारांवर इतकी मेहेरबानी का? किंवा जाणूनबुजून गुजराती ठेकेदारांना ही कामे देत दिल्लीश्वरापुढे गुडघे टेकले की काय? असे समजायचं असा सवाल आता ठाणेकर नागरिकांना पडला आहे.       ठाणे महापालिकेने ठाण्यातील मोठ्या रस्त्यांची सफाई करण्यासाठी एकूण सहा सफाई यंत्र गाड्या घेण्यात येणार असून त्यापैकी दोन गाड्या महापालिकेच्या ताफ्यात काही महिन्यांपुर्वी दाखल झाल्या आहेत. त्या गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्या गाड्या पालिकेने गुजरात येथील कंत्राटदाराकडून भाडे तत्वावर घेतल्या आहेत. याच गाड्यांवरून वादंग झाला होता. हा वाद शांत होत नाही तोच शुक्रवारी रात्री ठाणे शहरातील कापूरबावडी येथे मेट्रोचे गर्डर टाकण्यासाठी महाकाय क्रेन मागवली होती. 

मेट्रोचे काम एमएमआरडीए मार्फत जोरात सुरु आहे. त्या कामासाठी मागवलेली क्रेन ही गुजरात पासिंगची असल्याचे समोर आले आहे. या वरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.तसेच महाराष्ट्र गुजरातला झुकते माप का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. तसेच काम करताना किमान महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या वापराव्या, किंवा गुजरात पासिंगच्या गाड्या वापरून राज्य सरकार काय सिद्ध करू पाहत आहे असा सवाल ही ठाणेकर नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :thaneठाणे