शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग; कळवा, मुंब्य्रातील ७२५ घरांना नोटीस, मुंब्रा बायपासवरील ४५ कुटुंबाचे स्थलांतर

By अजित मांडके | Updated: July 28, 2023 16:55 IST

...या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे.

ठाणे : मुंब्रा बायपास रोडवरील मुंब्रा देवीच्या भागात गुरुवारी भुस्कलन झाले. या घटनेनंतर, याठिकाणीही इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे महापालिका आणि वनविभागाने येथील ४५ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर बाजूच्याच शाळा, मशीद आणि मंदिरात केले आहे. परंतु यापुढेही जाऊन कळवा आणि मुंब्य्रातील डोंगराच्या पायथ्याशी आणि डोंगरावर वसलेल्या तब्बल ७२५ घरांना महापालिकेने पुन्हा नोटीस बजावून येथील रहिवाशांना पावसाळ्यात स्थलांतर होण्याचे आवाहन केले आहे.इर्शाळवाडी येथे घडलेल्या घटनेला आज १० दिवस होऊन गेले. यात २७ जणांचे प्राण गेले असून ५७ जण अद्यापही बेपत्ता आहेत. परंतु या घटनेनंतर ठाण्यातील १४ दरड प्रवण क्षेत्रांचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यात कळवा, मुंब्रा आदी ठिकाणच्या भागांचा अधिक प्रमाणात समावेश आहे. त्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपासवरील मुंब्रा देवी परिसरात भुस्कलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही जिवीत हानी झाली नसली तरी देखील ठाणे महापालिका आणि वनविभागाने खरबदारी घेत येथील ४५ कुटुंबांचे स्थलांतर केले आहे. दुसरीकडे येथे अतिजोखीमीच्या भागात असलेली ९ घरे सील करण्यात आल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले.यापुढे जाऊन आता महापालिका जागी झाली असून त्यांनी कळवा आणि मुंब्रा भागातील दरड प्रवण क्षेत्रात वास्तव्य करणाºया रहिवाशांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत येथील ७२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यात कळव्यातील ५०० हून अधिक आणि मुंब्रा बायपासवरील २२५ घरांना नोटीस बजावण्यात आल्या असल्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. तसेच घरोघरी जाऊन येथील रहिवाशांना सर्तक राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. किमान पावसाळ्यापर्यंत तरी दुसरीकडे रहावे असे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.दुसरीकडे वनविभागाने देखील आता भुस्कलनाच्या घटनेनंतर जागे झाले असून, कळवा - मुंब्रा भागातील घोलाई नगर, आतकोनेश्वर नगर, कारगिल कोंडा आदी भागात पावसाचा जोर लक्षात घेत सर्तक राहण्याच्या सुचना करणारे फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील ८ ते १० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

टॅग्स :mumbraमुंब्राthaneठाणे