शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारांनंतर आता बिल्डरांकडे महानगरपालिकेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:32 IST

मजूर, कर्मचाऱ्यांची चाचणी : खाजगी लॅबला दिले झुकते माप?

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : आर्थिक मंदीमुळे रिअल इस्टेटचे आधीच कंबरडे मोडले असताना, आता चार ते पाच महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे हे क्षेत्र आणखीनच अडचणीत आले आहे. मात्र, ठामपाच्या काही अधिकाऱ्यांनी किराणा दुकानदारांनंतर आता शहरातील छोट्यामोठ्या बिल्डरांना त्यांच्याकडे असलेल्या बांधकाम मजुरांसह कर्मचाºयांची कोविड टेस्ट काही विशिष्ट खासगी लॅबकडून करवून घेण्याचे फर्मान सोडले आहे. यात खासगी लॅबवाल्यांची चांदी होणार असून बिल्डरांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.

कोरोना टेस्टसाठी शहरातील इन्फेवंशम लॅब, मिलेनिअम लॅब, कृष्णा डायग्नोस्टिक, सबर्बन डायग्नोस्टिक, थायरॉकेअर लॅब, मेट्रो पॉलिस लॅब आणि एसआरएल डायग्नोस्टिक या खासगी लॅबना महानगरपालिकेने आवतन दिले आहे.यासाठी पालिकेच्या सात कर्मचाºयांना नेमले असून प्रत्येक टेस्टसाठी २८०० रुपये दर ठेवण्यात आला आहे. विकासकांनी या टेस्ट केल्या नाहीत, तर साथरोग कायद्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशाद्वारे स्पष्ट केल्याने बांधकाम व्यावसायिकांना टेस्टशिवाय पर्याय नाही.उखळ पांढरे करण्याचा अधिकाºयांचा डावखाजगी लॅबमध्ये टेस्टची सक्ती करुन पालिकेचे काही अधिकारी उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप काही विकासकांनी केला आहे.बिल्डर म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असाच समज पालिकेचा आहे. आधीच आमची इंडस्ट्री डबघाईला आली आहे. हा उद्योग टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कशीबशी धडपड करत आहोत.महापालिकेला मोठा महसूल आमच्याकडून मिळत असतो. खरेतर, या अडचणीच्या काळात या टेस्ट पालिकेने मोफत करायला हव्यात किंवा मोफत अ‍ॅण्टीजन टेस्ट करण्याची मागणी या विकासकांनी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरिक्षततेच्या दृष्टिकोनातून विकासकांना मजुरांची तपासणी करण्यास सांगितले आहे. बांधकाम साईटवर शेकडो लोक काम करतात. त्यातील एखाद्यास संसर्ग असल्यास त्याची लागण अन्य मजुरांना होण्याची भीती आहे. त्यास आळा घालण्यासाठी मजुरांच्या तपासण्या करु न घेण्यास सांगितलेले आहे.- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे, मनपा