शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पावसानंतर भूस्खलनाने दोन घाटातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 04:37 IST

माळशेज, आंबेनळी घाटावर परिणाम; युद्धपातळीवर काम सुरु

ठाणे/ पोलादपूर : जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. सोमवारी सकाळी कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात संरक्षक भिंत व भूस्खलन झाले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक सोमवारी पूर्णपणे थांबवण्यात आली. तर, पोलादपूर -महाबळेश्वर मार्गावर सोमवारी सायंकाळी रानकडसरी ते प्रतापगड फाट्यादरम्यान दोन ठिकाणी आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली.कल्याण-अहमदनगर महामार्गावर माळशेज घाटात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. या घाटातील सावर्णे गावापासून जवळच ८५/६०० क्रमांकाची रस्त्याच्या कडेची संरक्षक भिंत पडली आहे. याशिवाय, भूस्खलन होऊन मातीचा ढिगारा रस्त्यावर पडला. रात्र असली तरी जीवितहानी झाली नाही. ट्रॅफिक पोलीस व बीटमार्शल यांच्या सतर्कतेने घाटातील वाहतूक नियंत्रणात आणून घटनेच्या ठिकाणी बचावात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या.तर, उल्हास नदीच्या पुरात रायता ब्रिजजवळील रस्ता वाहून गेला. या महामार्गावर मोरोशी चेकनाक्याच्या परिसरात झाडे पडली आहेत. मातीचा ढीग रस्त्यावर आहे. मोरोशी व आवळ्याचीवाडी यासह सावर्णे गावाजवळ आणि ठिकठिकाणच्या भूस्खलनाचा मातीचा ढिगारा जेसीबी मशीनच्या साहाय्याने युद्धपातळीवर हटवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, रायता ब्रिजजवळील रस्ता दुरुस्तीचे काम जलद गतीने सुरू आहे. महामार्गावरील सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश महाजन यांनी लोकमतला सांगितले.तर, पोलादपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यातच आंबेनळी घाटात दाट धुके असल्याने कामात व्यत्यय येत आहे. घटनास्थळी जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम चालू आहे. सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आंबेनळी घाटात दरड कोसळल्यानंतर पहाणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमृत पाटील, मनोहर निकम आणि ठेके दार दशरथ उतेकरगेले होते. पहाणी करून पोलादपूरकडे येताना सायंकाळी ७ वाजता दुसरी दरड कोसळली. त्यामुळे हे अधिकारीही अडकले आहेत. दरम्यान महाबळेश्वर- प्रतापगड रस्त्या दरम्यान दुधोशी फाट्याजवळ रस्ता खचला असल्याने प्रतापगडवरील पर्यटकांना मार्ग बंद झाला आहे.