शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईच्या निकालानंतरच निवडणुकांचे ‘कल्याण’

By admin | Updated: February 9, 2017 03:52 IST

केडीएमसीच्या परिवहन समितीच्या निवडणुकीसाठी कोणत्याच राजकीय पक्षाने अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली असताना

कल्याण : केडीएमसीच्या परिवहन समितीच्या निवडणुकीसाठी कोणत्याच राजकीय पक्षाने अर्ज भरला नाही. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलली असताना आता महिला-बालकल्याण सभापतीपदाची निवडणूकहीरद्द करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. बुधवारी निवडणुकीच्या दिवशी केडीएमसीच्या सचिव कार्यालयाने याची अधिकृत घोषणा केली. अटीतटीच्या दोन्ही निवडणुका लागोपाठ रद्द झाल्याने मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हस्तक्षेप यात झाल्याचे स्पष्ट होत आहे. मुंबईच्या निकालानंतरच येथील निवडणुकांचे ‘कल्याण’ होण्याची शक्यता आहे.अपरिहार्य कारणास्तव निवडणुकीची सभा स्थगिती करण्यात येत असल्याचे कारण ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिले. असे असलेतरी लागोपाठ रद्द झालेल्या निवडणुका पाहता यात प्रशासनही सत्ताधाऱ्यांपुढे झुकल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे महिला-बालकल्याण समितीच्या रद्द झालेल्या निवडणुकीच्या मुद्यावरही शिवसेना-भाजपामध्ये स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. पराभवाच्या भीतीपोटी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणूक रद्द करण्यास भाग पाडल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. महिला-बालकल्याण समितीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत होते. त्यामुळे आमचा विजय निश्चित होता. पराभूत झाल्यावर इतरत्र निवडणुकांमध्येदेखील एक वेगळा संदेश जाईल, ही भीती मुख्यमंत्र्यांना होती. त्यामुळेच निवडणूक रद्द करून ती पुढे ढकलण्याचे कारस्थान त्यांनी केल्याचा आरोप शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी केला आहे. केवळ शिवसेनेला महत्त्व मिळू नये, हाच हेतू मुख्यमंत्र्यांचा होता. हे क्लेशदायक असून लोकशाहीची विटंबना आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ठरला असताना तो असा अचानक स्थगित करता येतो का, कोणाच्या दबावाखाली हा निर्णय घेतला, असे सवाल जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही केले आहेत.भाजपानेदेखील त्याला प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या गटनेत्यांनी आपली पातळी पाहून वक्तव्ये करावीत. मुख्यमंत्र्यांचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. एवढ्या लहान निवडणुकीत मुख्यमंत्री लक्ष घालतील का, असा सवाल भाजपाचे गटनेते वरुण पाटील यांनी केला आहे. शिवसेनेकडे बहुमत होते, अशा बाता गटनेते मारत आहेत. त्यांनी आपल्या सदस्यांमध्ये एकमत होेते का, याचीही चाचपणी करावी, असेही पाटील यांनी सुनावले आहे. दरम्यान, दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करीत असलेतरी त्यांची युती स्थानिक पातळीवरही अभेद्य आहे, हे परिवहन समितीच्या निवडणुकीत अर्ज न भरण्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिला-बालकल्याण समितीच्या निवडणुकीच्या मुद्यावरही त्यांनी दिखावा करू नये, अशा शब्दांत विरोधी पक्ष असलेल्या मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी मत व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अपरिहार्य कारणास्तव निवडणूक पुढे ढकलत असल्याचे म्हटले आहे. यात त्यांनी परिपत्रकात ठोस कारणाचा उल्लेख केलेला नाही, यावरून प्रशासनही सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करीत असल्याचे चित्र स्पष्ट होते, असे हळबे म्हणाले. (प्रतिनिधी)