शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

किराणावाल्यांनंतर आता खासगी लॅबवाल्यांची बिल्डरांवर वक्रदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 19:02 IST

या एका टेस्टीसाठी 2800 रुपये दर ठेवला असून यात खासगी लॅबवाल्यांची चांदी होणार आहे तर बिल्डरांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.

ठाणे - आधीच रिअल इस्टेटचे आर्थिक मंदीमुळे कंबरडे मोडले असतानाच आता चार ते पाच महिन्याच्या लॉकडाऊनमुळे हे क्षेत्र आणखीनच अडचणीत आले आहे. मात्र ठामपाचे काही अधिकाऱ्यांनी किराणा दुकानदारांनंतर आता शहरातील छोट्या मोठ्या बिल्डरांना त्यांच्याकडे असलेल्या बांधकाम मजूर, आणि कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट काही विशिष्ट खासगी लॅब कडून करवून घेण्याचे फर्मान काढले आहेत. या एका टेस्टीसाठी 2800 रुपये दर ठेवला असून यात खासगी लॅबवाल्यांची चांदी होणार आहे तर बिल्डरांचे मात्र कंबरडे मोडणार आहे.

शहरातील किराणा दुकानदारांनी त्यांच्या सह त्यांच्या दुकानातील कर्मचाऱ्यांच्या कोविड टेस्ट विशिष्ट खासगी लॅब कडून करण्याची  पत्रके वाटल्यानंतर आता शहरातील बांधकामे सुरू असलेल्या साईड वरील छोट्या मोठ्या विकासकांनाही त्यांच्या कडील बांधकाम मजूर, कामगार आणि इतर स्टाफ यांच्या कोविड टेस्ट करण्याचे फर्मान काढले आहे. त्यासाठी शहरातील इन्फेवंशम लॅब, मिलेनिअम लॅब, कृष्णा डायग्नोस्टिक, सबर्बन डायग्नोस्टिक, थायरॉकेअर लॅब, मेट्रो पॉलिस लॅब आणि एसआरएल डायग्नोस्टिक या खासगी लॅबना आवतान देण्यात आले आहे. यासाठी पालिकेचे सात कर्मचाऱ्यांना नेमले असून प्रत्येक टेस्टसाठी 2800 रुपये दर ठेवण्यात आला आहे. विकासकांनी या टेस्ट केल्या नाहीत तर साथीरोग कायद्यानुसार त्यांच्यावर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात सांगण्यात आले आहे.

या सगळ्या मागे पालिकेचेच काही अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप काही विकासकांनी केला आहे. बिल्डर म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असाच समज पालिकेचा असून, आधीच आमची इंडस्ट्री डबघाईला आली असतांना आम्ही कशीबशी ही इंडस्ट्री जगविण्यासाठी धडपडतोय. पालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल आमच्याकडून मिळत असतो. खरं तर या अडचणीच्या काळात या टेस्ट पालिकेने मोफत करायला हव्यात किंवा मोफत अँटीजन टेस्ट करण्याची मागणी या विकासकांनी केली आहे.