शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांची मते ठरली बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:48 IST

चुकीच्या पद्धतीने मतदान : ईटीटीपीविषयी जनजागृतीची गरज

- सुरेश लोखंडे 

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील मतदानाची गुरुवारी ठिकठिकाणी मतमोजणी झाली. ईव्हीएम मतदानयंत्रांतील सर्व मतदान ग्राह्य धरण्यात आले. मात्र, सरकारी सेवेतील काही मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरच्या साहाय्याने मतदानाचा हक्क बजावला. परंतु, या बॅलेटपेपरद्वारे मतदानाची पद्धत माहीत नसल्यामुळे काहींनी ते चुकीच्या पद्धतीने केले. यामुळे तिन्ही मतदारसंघांतील पोस्टल बॅलेटपेपरची १२६४ मते बाद ठरली आहेत.

जिल्ह्णातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यांना ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले. यामध्ये सरकारी नोकरीनिमित्त मतदारसंघापासून लांब वास्तव्यास असलेले, सैन्यदलात असलेले आणि परदेशात वास्तव्य असलेले पण या मतदारसंघाचे मतदार असलेले आदींनी पोस्टल बॅलेटपेपर आणि ईटीटीपी या दोन पद्धतीने मतदानाचा हक्क बजावला.

ठाणे लोकसभा निवडणुकीत तीन हजार ८३२ मतदारांनी पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला. यातील तीन हजार ३१९ मतदान ग्राह्य धरले. तर, ४५२ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरवण्यात आले, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी लोकमतला सांगितले. यातील उर्वरित ६१ मतदारांनी नोटाचा वापर केला.

कल्याण लोकसभेसाठी दोन हजार ७३७ मतदारांनी पोस्टल बॅलेट पेपरने मतदानाचा हक्क बजावला. त्यातील दोन हजार ३२१ जणांचे मत ग्राह्य धरले, तर ३७ मतदारांनी नोटाचा वापर केला. पण, ३७९ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांचे मत बाद ठरले आहे. भिवंडी लोकसभेचे मतदार असलेल्या तीन हजार ८३२ मतदारांनी मतदान केले. परंतु, यातील ४३३ जणांचे मतदान बाद केले, तर ४२ जणांनी नोटाचा वापर करून मतदानाचा हक्क बजावला.बॅलेटपेपरची माहिती नाहीनऊ हजार ४११ मतदारांनी या पोस्टल बॅलेटपेपरने मतदानाचा हक्क बजावला आहे; परंतु यातील १ हजार २६४ मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यामुळे त्यांची मते बाद ठरवण्यात आली.

टॅग्स :thane-pcठाणे