शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 2, 2024 16:10 IST

ठाणे जिल्हा शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला गणेश दर्शन पारितोषिक वितरण सोहळा २०२२-२३ गडकरी रंगायतनमध्ये पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका घरामध्ये एक कुटुंब सुखी होण्यासाठी आपल्या सरकाने जे निर्णय घेतले ते आतापर्यंतच्या सरकारने घेतलेले नाहीत. मी अपॉइंटवर चालणारा मुख्यमंत्री नाही. पुर्वी एसटी हात दाखवून थांबवली जात तसेच माझे आहे. मला कोणी भेटले की थांबावे लागते अशा भावना व्यक्त करत विजयाचा संकल्प आम्ही सोडणार आणि दिवाळीनंतर फटाके महायुतीच फोडणार असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आपल्याला सगळ्या योजना पुढे चालू ठेवायच्या आहेत असेही ते म्हणाले. 

ठाणे जिल्हा शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला गणेश दर्शन पारितोषिक वितरण सोहळा २०२२-२३ गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. यावेळी या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या विविध गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्री शिंदे आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. दरम्यान, शिंदे म्हणाले की, मी सीएम म्हणजे स्वत:ला कॉमन मॅन म्हणतो. 

अपेक्षा ठेवून काम केले आणि जर ते मिळाले नाही तर माणसाचा भ्रमनिरास होतो तो माणूस समाजसेवा आणि राजकीय जीवनातून कायमचा नष्ट होतो. म्हणून मला काय मिळेल यापेक्षा मी दुसऱ्याला काय देईल हा विचार करुन आपण काम केले पाहिजे. मी ज्यावेळी लाडकी बहिण, लाडका भाऊ ही योजना आणली तेव्हा विरोधकांनी ही निवडणूकीसची घोषणा असल्याचे आरोप केले. पण मी जे करणार तेच बोलणार. माझ्या डोक्यात मी मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक योजना होत्या. लाडकी बहिण ही योजना बंद करण्यासाठी अनेक जण न्यायालयात गेले. मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो की सावत्र भावांपासून सावध रहा. हे सावत्र भाऊ, आता हायकोर्टात गेले आहे. तुम्ही सरकारची ताकद वाढवली तर महिलांना सक्षम करण्यासाठी तीन हजारांच्या पुढेही पैसे द्यायला हात आखडता घेणार नाही आणि भावांसाठी पण तेच करणार असे ते म्हणाले.

अभिनेते मकरंद अनासपुरे, खा. नरेश म्हस्के, आ. प्रताप सरनाईक, यावेळी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, आ. कुमार आयलानी, माजी आ. रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे व इतर शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना