शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या दणक्यानंतर नालेसफाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:11 IST

उल्हासनगर पालिका : पहिल्याच पावसात झाली पोलखोल

उल्हासनगर : पहिल्या पावसाने नालेसफाईचा बोजवारा उडाल्यावर आयुक्तांनी मंगळवारी आरोग्य विभागाची आढावा बैठक घेत नाले सफाईचे आदेश दिले. त्यानुसार आरोग्य विभागाने बुधवारपासून वालधुनी नदीसह मोठया नाल्यांच्या साफसफाईला सुरूवात केली असल्याचे मुख्य स्वच्छता निरिक्षक विनोद केणे यांनी सांगितले. उल्हासनगरमध्ये पहिल्या पावसाने बोजवारा उडाल्याच्या तक्रारी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन साफसफाईचा आदेश दिला. तसेच भारत स्वच्छता अभियाना अंतर्गतील साफसफाई, शून्य कचरा, हगणदारी मुक्त शहर, स्वच्छतागृहाची साफसफाई, शुध्द पाणी आदींच्या कामाचे आदेश दिले.

त्यानुसार केणे व एकनाथ पवार यांनी मोठया नाल्यांच्या सफाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. वालधुनी नदीसह मोठया नाल्यांची पुन्हा सफाई सुरू झाली आहे. वालधुनी नदी पुला खालील गाळ व वाहून आलेला कचरा काढण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी केली होती.्वालधुनी नदीची सफाई झाली नसल्याची ओरड नगरसेवकांसह नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी केली होती. लहान नाल्याच्या सफाई साठी रोज ३०० कंत्राटी कामगार काम करतात. खेमानी नाला, गायकवाड पाडा नाला, तानाजीनगर-समतानगर नाला, गुलशननगर नाला, रमाबाई आंबेडकर विद्यालयाजवळील नाला अद्यापही तुंबले असून कचºयात प्लास्टिक पिशव्यांचा सर्वाधिक भरणा आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली आहे.कचरा उचलण्याची मागणीवालधुनी नदीसह मोठया नाल्यातील काढलेला कचरा किनाºयावर टाकला जातो. नाल्यातून काढलेला कचरा त्वरित हटविण्याची गरज असते. मात्र तसे होत नसल्याने पावसामुळे किनाºयावरील कचरा पुन्हा नदीपात्रात वाहून जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी आयुक्तांकडे केला आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे