शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

अखेर. . . उल्हासनगरचा टायगर झाला परदेशी; शहरवासीयांनी पुढील आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा

By सदानंद नाईक | Updated: February 17, 2023 16:23 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील नालीत फेकलेल्या प्लास्टिक पिशवीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने, महिलांचा घोळका बघण्यासाठी एकत्र आला.  त्यातील काही धाडसी महिलांनी नालीतील प्लास्टिक पिशवी बाहेर काढली असता, काही तासापूर्वी जन्मलेले बाळ जिवंत पण अत्यवस्थ अवस्थेत दिसले.

उल्हासनगर : नववर्षाच्या स्वागताची तयारी सर्वत्र सुरू असताना चार वर्षांपूर्वी ३० डिसेंबर २०१९ साली नाल्यात प्लास्टिकच्या पिशवीत मिळालेल्या टायगरला मोठ्या शर्थीने वाचविण्यात यश आले. अनाथ टायगरला एका परदेशी दांपत्याने स्वीकारले असून शहरवासीयांनी व रगडे दांपत्याने त्याच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ सम्राट अशोकनगर येथील नालीत फेकलेल्या प्लास्टिक पिशवीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने, महिलांचा घोळका बघण्यासाठी एकत्र आला.  त्यातील काही धाडसी महिलांनी नालीतील प्लास्टिक पिशवी बाहेर काढली असता, काही तासापूर्वी जन्मलेले बाळ जिवंत पण अत्यवस्थ अवस्थेत दिसले.  स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मूल सापडल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना देऊन त्याचा जीव वाचविण्यासाठीं मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन गेले.  पोलीस संरक्षणात मुलावर उपचार सुरू असताना त्यांच्या मेंदूला संसर्ग झाल्याचे उघड झाले.  त्यानंतर खाजगी रुग्णालयात मुलाला हलवून शिवाजी रगडे यांनी स्वतःचा पैसा खर्च केला.  मात्र तब्येत बिघडल्याने, मुलाला मुंबई येथे पोलीस संरक्षणात हलविण्यात आले. 

 उल्हासनगरच्या टायगरला वाचविण्यासाठी शहरवासीय पुढे सरसावले.  टायगरच्या तब्येतीची माहिती सोशल मीडियावर दररोज देण्यात येत असल्याने, टायगर सर्वांच्या गळ्यातील ताईत बनला.  पुढील उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयाने मदत मागताच काही तासात लाखो रुपये बँक खात्यात जमा झाले.  त्यानंतर रुग्णालयाला बँक खाते बंद करावे लागले.  तत्कालीन पालकमंत्री व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे हे टायगरच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून होते.  सर्वांच्या प्रयत्नाला यश येऊन व अनेक शस्त्रक्रिया होऊनही टायगर ठणठणीत झाला.  तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगरला त्यांच्या ठाणे घरी बोलावून जल्लोषात स्वागत केले होते.  त्यानंतर शासन नियमानुसार त्याला नवीमुंबई येथील बालगृहात ठेवण्यात आले.  रगडे दांपत्य दरवर्षी तेथे जाऊन वाढदिवसाच्या केक कापून नवनवीन कपडे, खाऊ देत होते.  प्रसिद्ध अभिनेते सलमान खान यांनीही टायगरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.  मात्र संरक्षणाचा मुद्दा पुढे करून भेट नाकारण्यात आली होती. इटालियन दाम्पत्यानी टायगरला स्वीकारले नवीमुंबईतील बालगृहातून त्याची दत्तक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून त्याला एका इटालियन दाम्पत्याने मुलगा म्हणून स्वीकारले आहे.  अखेर उल्हासनगरचा टायगर परदेशी झाला असून दत्तक प्रक्रियावेळी रगडे दांपत्य उपस्थित होते.  

टॅग्स :thaneठाणेTigerवाघ