शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

अखेर मुंब्य्रातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:45 IST

फेरीवाले झाले हद्दपार : ठामपाची कारवाई

ठाणे : राजकीय इच्छा शक्ती आणि प्रशासनाचे पाठबळ असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण सध्या मुंब्य्रातील रस्त्यांकडे पाहिल्यास मिळू शकते. गेली ३० वर्षे फेरीवाल्यांनी व्यापलेल्या येथील मुंबई -पुणे रस्त्याने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. दोन महिन्यांपासून येथील फेरीवाल्यांवर कारवाई सुरूअसल्यामुळेच आज खऱ्या अर्थाने हा रस्ता मोकळा झाला असून वाहतूककोंडीतूनही मुंब्रावासीयांची सुटका झाली आहे.

फेरीवाला ही संपूर्ण ठाण्याला सतावणारी समस्या आहे. शहरातील स्टेशन परिसर असो किंवा घोडबंदर भाग, वागळेपट्टा आज प्रत्येक रस्त्यावर, फुटपाथवर त्यांचे प्रस्थ वाढलेले दिसत आहे. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने कारवाई करतांनासुद्धा प्रशासन फारसे पुढे येतांना दिसत नाही. दुसरीकडे मुंब्य्रासारख्या परिसरात तर कारवाई करतांना अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार सहन करावा लागला आहे.

दोन महिन्यांपूर्वीच अशा प्रकारे कारवाई करणाºया पालिकेच्या एका कर्मचाºयाला जबर मारहाण झाली होती. असे असतांनाही मुंब्य्रातील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार पावले उचलल्यानेच आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीचे पाठबळ मिळाल्याने येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. रमजानचा महिना असतांनाही या भागातील रस्त्यांवर एकही फेरीवाला दिसत नाही. महापालिकेच्या वतीने सांयकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत येथे जागता पाहरा सुरू आहे. या काळात नजरचुकीने लागत असलेल्या हातगाड्यांवर कारवाईचा धडाका आजही सुरूच आहे. दोन महिन्यात येथील सुमारे ४ हजाराहून अधिक फेरीवाल्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने कोणाचीही तमा न बाळगता कारवाई केली आहे.

आतापर्यंत झालेली कारवाई१ नोव्हेंबर २०१८ ते आजपर्यंत मुंब्य्रातील ४०६४ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर ४२७१ बॅनर पोस्टर काढण्यात आले असून, ६६ गाळे, ३८० झोपड्या, ६२ इमारती, नव्याने उभ्या राहत असलेल्या ११ प्लिंथचे बांधकामे तोडण्यात आली आहेत. शिवाय ३२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ३५३ अंतर्गत अन्य तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रस्ता झाला मोकळा...पूर्वी मुंब्रा ते पुढे शीळफाट्याला जाण्यासाठी फेरीवाल्यांनी रस्ता अडविल्यामुळे एक ते दीड तासांचा कालावधी वाहनचालकांना लागत होता. परंतुख आता फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्याने हा रस्ता मोकळा झाला असून अवघ्या १० मिनिटांत हे अंतर कापणे शक्य झाले आहे.

रुंदीकरणाचाही झाला फायदामहापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतांनाच येथील रुंदीकरणाची मोहीम राबविल्याने येथील रस्ता आता चौपदरी झाला आहे. त्यामुळे सुद्धा वाहनांचा वेग वाढला आहे. 

राजकीय इच्छा शक्ती असेल तर प्रशासन सुद्धा योग्य पद्धतीने आपले काम करत असते. यामुळे आम्हीही प्रशासनाला या कारवाईत आडकाठी आणली नाही, यामुळेच आज मुंब्य्रातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.- जितेंद्र आव्हाड,स्थानिक आमदार, राष्टÑवादीफेरीवाल्यांचे पुनर्वसन सुरूरस्ता फुटपाथ अडवून व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांसाठी गुलाब पार्क मार्केट हलवून ते मित्तलच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात हलविण्यात आले आहे. शिवाय येथील आणखी एका जागेतही फेरीवाल्यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. शिवाय ईद येत असल्याने आणखी जागेची मागणी वाढली असल्याने त्यानुसार तन्वरनगर भागात तात्पुरत्या स्वरुपात गाळे उभारण्यात येऊन, त्याठिकाणी वीजेची आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून येथे २९० गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.- महेश आहेर, सहाय्यक आयुक्त, मुंब्रा, प्रभाग समिती