शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅडमिशनच्या नावावर उकळले २१ लाख

By admin | Updated: January 15, 2017 05:16 IST

नवी मुंबई, कामोठे येथील महाविद्यालयात एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील तिघांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.

ठाणे : नवी मुंबई, कामोठे येथील महाविद्यालयात एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ठाण्यातील तिघांना सुमारे २१ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गंडा घालणारा भामटा सध्या पोक्सो गुन्ह्याखाली न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.उपवन येथील पोळीभाजी केंद्र चालवणारे राज मिलिंद कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत, पाचपाखाडी, पाटीलवाडीतील सुयोग भोईर याने त्यांना व त्यांचा भाचा विजय शिरसाठ आणि त्यांच्या ओळखीच्या प्रकाश चोळेकर यांचा मुलगा धीरज यास कामोठे, नवी मुंबई येथील एमजीएम कॉलेजमध्ये एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार, भोईर याने आपल्याच घरी त्यांच्याकडून दोन टप्प्यांत २० लाख ५० हजार रुपये घेतले. हा प्रकार आॅगस्ट २०१५ ते आॅक्टोबर २०१६ दरम्यान घडला. पैसे देऊनही अ‍ॅडमिशन मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवारी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. (प्रतिनिधी)मध्यवर्ती कारागृहाकडे करणार पत्रव्यवहारगंडा घालणाऱ्या सुयोग यांच्याविरोधात २०१६ मध्ये पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल असून त्यामध्ये त्याला अटक केली आहे. त्यामुळे तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्याच्याविरोधात नौपाडा पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तसेच फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याचा ताबा मिळावा, यासाठी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करीत आहेत.