शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

धर्मादाय रुग्णालयांच्या मनमानीला अखेर प्रशासनाचा चाप

By admin | Updated: April 18, 2017 03:22 IST

धर्मादाय रु ग्णालयांनी मोफत व सवलतीच्या दरात गरीब रु ग्णांसाठी खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. रु ग्णालयांनी खाटा उपलब्ध करून न दिल्यास ठाणे

ठाणे : धर्मादाय रु ग्णालयांनी मोफत व सवलतीच्या दरात गरीब रु ग्णांसाठी खाटा राखून ठेवणे बंधनकारक आहे. रु ग्णालयांनी खाटा उपलब्ध करून न दिल्यास ठाणे जिल्ह्यातील रुग्णांनी १०४ या हेल्पलाइनवर तसेच धर्मादाय आयुक्त यांच्याकडे ०२२-२५३४६५२३ या क्रमांकावर त्वरित तक्रार करण्याचे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.मोफत व सवलतीच्या दरात खाटा राखून ठेवण्याबाबतच्या अंमलबजावणी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या समितीचे प्रमुख ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर या वेळी उपस्थित होते. सद्य:स्थितीला जिल्ह्यात १६ धर्मादाय रु ग्णालये असून त्यात दोन हजार ४९४ खाटा उपलब्ध आहेत. त्यापैकी प्रत्येकी निर्धन तसेच दुर्बल रु ग्णांसाठी मिळून ५०२ खाटा उपलब्ध असल्याचे सहायक धर्मादाय आयुक्तांनी या वेळी सांगितले. मात्र. त्याचादेखील गरिबांना फायदा होत नसल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक घेऊन या धर्मादाय रुग्णालयांना गरिबांसाठी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यात डॉ. डी.वाय. पाटील, तेरणा मेडिकल कॉलेज, एमजीएम वाशी आणि बेलापूर, पीकेसी हॉस्पिटल वाशी, लायन आर. झुनझुनवाला हॉस्पिटल कोपरखैरणे, भक्तिवेदान्त हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, कौशल्य मेडिकल फाउंडेशन, रहेमानिया हॉस्पिटल, स्वामी सर्वानंद हॉस्पिटल, मानव कल्याण, महाराष्ट्र होली क्र ॉस, सोशल सर्व्हिस लीग अ‍ॅण्ड जनरल हॉस्पिटल, अर्चना पब्लिक ट्रस्ट, सेंच्युरी रेयॉन आदी रुग्णालयांना गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. रु ग्णांना कोणत्या रु ग्णालयांत किती खाटा आहेत, याची माहिती नसते. ही माहिती त्यांना मिळावी, म्हणून रुग्णालयांच्या सूचना फलकांवरही याची माहिती देण्याचे चव्हाण यांनी सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेची ओळखपत्रे रु ग्णांकडे नसतात. यासाठी विशेष शिबिरे जिल्ह्यात आयोजित करण्याचेही जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले. समितीच्या पथकाने अचानक या रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करण्याचेही त्यांनी या वेळी सूचित केले. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी, तहसीलदार समीर घारे, सहायक धर्मादाय आयुक्त उपस्थित होते. (प्रतिनिधी)