शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन सेवेचा खाजगीकरणाचा डाव आखण्याचा प्रशासनाचा डाव - आ. केळकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 17:00 IST

टायर नसल्याने ४० बसेस धुळ खात, १० एसी बसेस बंद, कंत्राटदाराच्या जीवावर सुरु असलेली टीएमटी सेवा, कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक संकटात ठाणे परिवहन सेवा सापडली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी परिवहनच्या वागळे आगाराची पाहणी केली.

ठळक मुद्दे१० एसी बसेस बंद४० बसेस टायर अभावी धुळखात

ठाणे - एकीकडे परिवहन सेवेचे उत्पन्न वाढल्याचे दाखले पालिका प्रशासनाकडून दिले जात आहेत. वास्तविक पाहता, वाढलेले हे उत्पन्न याचा फायदा खाजगी कंत्राटदाराला अधिक होत असल्याचा आहे. त्यामुळे परिवहनच्या हक्काच्या बसेस मार्गावर धावत नसून हा प्रशासनाचा खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे.                     सोमवारी त्यांनी वागळे आगाराची पाहणी केली. यावेळी त्यांच्या निर्दशनास अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. परिवहनच्या ताफ्यात १८७ बसेस असल्या तरी प्रत्यक्षात त्यातील केवळ ५९ बसेसच रस्त्यावर धावत आहेत. टायर नसल्याने तब्बल ४० बसेस बंद अवस्थेत आहेत, तर इतर किरकोळ दुरुस्तीसाठी देखील बसेस बंद आहेत. मोठा गाजावाजा करुन घेण्यात आलेल्या १० एसी बसेस देखील बंद असल्याची बाब या पाहणी दौऱ्यात समोर आल्याचे केळकर यांनी सांगितले. एकीकडे उत्पन्न वाढविले असल्याचे भासविले जात असतांना दुसरीकडे मात्र प्रशासनाकडून केवळ आपल्या बसेस बंद करुन, कामगारांवर पोटमारीची वेळ आणत आहेत, एकूणच हा सर्व प्रकार म्हणजे परिवहनचे खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठाणेकरांना चांगली सेवा मिळावी म्हणून परिवहन सेवा सुरु करण्यात आली. परंतु आता तीच सेवा बंद करण्याचा घाट प्रशासन आणि सत्ताधाºयांकडून आखला जात आहे. खाजगी कंत्राटदाराला परिवहनचे रुट देऊन त्याचे खीसे गरम करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. कामगारांची १४ टक्के थकबाकी अद्याप देण्यात आलेली नाही, तीन वर्षापासून त्यांना गणवेश मिळालेला नाही, कामगारांचे अनेक प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याची धन्यता देखील सत्ताधारी दाखवित नाहीत. केवळ सुपाºया वाजविण्याचे कामच त्यांच्याकडून होत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. त्यामुळे या विरोधात आता थेट शासनाकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त