शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

जिल्हा रुग्णालयातील ९० वर्षे जुनी सफाई कामगांराची चाळ हलविणार कोरोना पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 17:27 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालय परिसरात असलेल्या चाळीमधील नागरीकांना कोरोनाची लागण होऊ नये या उद्देशाने आता येथील ९० वर्षे जुनी चाळच हलविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार तसे आदेशही या चाळीतील रहिवाशांना देण्यात आले आहेत.

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. याठिकाणी रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, याठिकाणी असलेली सफाई कामगारांची ९० वर्षे जुनी चाळही येथून आता हलविण्याचा निर्णय सिव्हील प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार त्यांचे स्थलांतर आता घोडबंदर भागातील ब्रम्हाड येथे करण्यात येणार आहे. त्याठिकाणी येथील १६ कुटुंबांना घरे दिली जाणार आहेत.                जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीतांचा आकडा वाढत आहे. तिकडे मुंबईतील रुग्णालयावर ताण येत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी राज्यात इतर ३० ठिकाणी कोरोना रुग्णालय सुरु करावेत असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आता ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे आता खास कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. येथील १५० रुग्णांना महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलविण्यात आले आहे. परंतु जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच सफाई कामगारांची ९० वर्षे जुनी चाळ देखील आहे. ब्रिटीशांनी या रुग्णालयाची सुरवात केल्यानंतर त्याचवेळेस येथे ही चाळही सफाई कामगारांसाठी उभारण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता आता येथील ही जुनी चाळ हलविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याठिकाणी राहणाऱ्या सफाई कामगारांना किंवा त्यांच्या घरच्यांना याची लागण होऊ नये यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाशल्य चिकित्सक कैलाश पवार यांनी दिली. त्यानुसार आता या सर्वांचे घोडबंदर भागातील ब्रम्हाड भागात स्थलांतर करण्यात येणार आहे. या नवीन ठिकाणीच आता हे सफाई कामगार वास्तव्यास असतील असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCivil lineसिव्हिल लाइन