शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शवागृहाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाला आली जाग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 05:39 IST

इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयातील शवागृहातील दुरवस्थेबाबत गुरूवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशसानाला खडबडून जाग आली. या संदर्भात महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत याबाबत सरकारकडून कारवाई करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सरकारकडे पाठवण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

भिवंडी : इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयातील शवागृहातील दुरवस्थेबाबत गुरूवारच्या ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच प्रशसानाला खडबडून जाग आली. या संदर्भात महापौर जावेद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत याबाबत सरकारकडून कारवाई करण्यासाठी संबंधित कागदपत्रे सरकारकडे पाठवण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.दोन ते तीन महिन्यांपासून रडत-रखडत सुरू असलेले उपजिल्हा रूग्णालयातील शवागृह बंद झाल्याने हा विषय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या नाकर्तेमुळे रखडल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. रूग्णालयातील शवागृह सुरू नसल्याने मृतदेहाची हेळसांड होत आहे. ही बाब अत्यावश्यक असताना याची सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर दखल न घेता टाळाटाळ केल्याने महापौर संतप्त झाले.महापौरांनी आपल्या दालनात घेतलेल्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकारी नितीन भोये हे उपस्थित न राहता त्यांनी सहायक अभियंता ए. एस. पवार यांना पाठवले. उपायुक्त अनिल डोंगरे, इंदिरा गांधी स्मृती रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनिल थोरात, वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी, विधी अधिकारी अनिल प्रधान, शहर अभियंता एस. आर निकम, मिळकत अधिकारी राजू श्रीमल आणि बांधकाम विभागातील अभियंता उपस्थित होते.भिवंडी शहरासह या रूग्णालयात ग्रामीण भागातील वाडा,शहापूर व इतर ठिकाणाहून रूग्ण येतात. या रूग्णांवर योग्य उपचार व्हावे यासाठी हे रूग्णालय महापालिकेने ३० वर्षासाठी १ रूपया नाममात्र भाड्याने दिले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर महापौर म्हणून मी सरकारच्या विधी अधिकाºयांच्या उपस्थितीत करारनामा केला आणि या रूग्णालयाचे हस्तांतरण केले असे दळवी यांनी सांगितले. परंतु सार्वजनिक बांधकाम विविध कारणे पुढे करत अडवणूक करत असल्याने रूग्णांचे हाल होत आहे, असे त्यांनी सांगितले. या अडवणुकीमुळे सरकारने २०० बेडची मंजुरी दिली असताना त्याचा फायदा रूग्णांना होत नाही. मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर रूग्णालयात येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी अपेक्षित कागदपत्रे पालिका अधिकाºयांकडून घेऊन व जागेचे मोजमाप करून रूग्णास सवलती मिळण्यास मदत करावी,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता पवार यांना सांगितले.२०० बेडचे रूग्णालयसध्या अस्तित्वात असलेल्या शवागृहाची दुरूस्ती करून ते सुरू करण्यात येईल. तसेच इंदिरा गांधी रूग्णालयातही दुरूस्ती व सुधारणा करून २०० बेडचे रूग्णालय करणार असल्याचे महापौर जावेद दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.