शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराचाच नाही पत्ता

By admin | Updated: April 14, 2017 03:23 IST

मीरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपामध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा घाट दोन्ही पक्षाकडून

मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून शिवसेना आणि भाजपामध्ये राजकीय चढाओढ सुरू झाली आहे. क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्याचा घाट दोन्ही पक्षाकडून घातला जात आहे. तीन वर्षापूर्वीच तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे. त्यानंतर हे संकुल कंत्राटदाराअभावी बंदच आहे. मध्यंतरी झालेल्या आंदोलनानंतर केवळ कॅरम, बॅडमिंटनला सुरूवात झाली. मूळात कंत्राटदाराचाच पत्ता नसताना उद्घाटन कशासाठी? उद्घाटनानंतरही ते सुरू होणार का असा सवाल क्रीडापटूंनी विचारला आहे. भाईंदर येथील क्रीडा संकुल चालवण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्याची ओरड करणाऱ्या पालिकेने आलेल्या निविदांमध्ये इच्छुकांनी पालिकेस वार्षिक १५ लाख देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र निविदा समितीने मात्र पुन्हा फेरनिविदा मागवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. या प्रकारामुळे मर्जीतील कंत्राटदारासाठी पालिकेने खटाटोप चालवल्याचा आरोप माजी सभापती प्रमोद सामंत यांनी केला आहे. मीरा- भार्इंदरमध्ये अद्ययावत क्रीडा संकुल असावे म्हणून तत्कालीन खासदार संजीव नाईक यांच्या प्रयत्नाने न्यू गोल्डन नेस्ट जवळ २०१२ मध्ये क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात झाली. तर फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी तरणतलाव आदी काही कामे अपूर्ण होती. दरम्यान, क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होऊन ते चालवण्यासाठी पालिकेने धोरण ठरवत निविदा मागवल्या होत्या. पण प्रतिसाद न मिळाल्याने अखेर पालिकेने स्वत: हून अनुदान देण्याची तयारी दर्शवली. अनेकदा निविदा मागवूनही प्रतिसाद मिळत नव्हता. क्रीडा संकुलाचे बांधकाम व त्याच्या देखभालीसाठी कोट्यवधीचा खर्च होत असताना ते चालवण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याने संकुल धूळखात होते. संकुल सुरू करण्यासाठी जिद्दी मराठा संस्थेच्या वतीने प्रदीप जंगम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिके बाहेर धरणे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला विविध लोकप्रतिनिधी, संस्था व नागरिकांचे समर्थन मिळाल्याने अखेर पालिकेने कॅरम, बॅडमिंटन खेळ सुरू केले. दरम्यान, पालिकेचे संकुल चालवण्यासाठी मागवलेल्या निविदेत एकूण चार इच्छुकांपैकी दोघांनीच दर दिला होता. २९ मार्चला तांत्रिक चाचणी केल्यावर निविदा उघडण्यात आली. यामध्ये एकाने १५ लाख ३ हजार तर दुसऱ्याने १५ लाख २५ हजार पालिकेला देण्याची तयारी दर्शवली. परंतु निवड समितीने मिळणारी रक्कम तुटपुंजी असून पुन्हा निविदा मागवण्यास सांगितले. समितीमध्ये उपायुक्त विजयकुमार म्हसाळ, लेखा परीक्षक निपाणी, मुख्यलेखाधिकारी शरद बेलवटे, शहर अभियंता शिवाजी बारकुंड व सबंधित विभागचे विभाग प्रमुख दीपक पुजारी उपस्थित होते. पुन्हा निविदा मागवण्याच्या समितीचा निर्णय धक्कादायक तसेच संशयास्पद असल्याची झोड उठू लागली आहे. (प्रतिनिधी)निवड समितीने निर्णय रद्द करावा- माजी सभापती प्रमोद सामंत यांनी निषेध केला असून अन्य कामांसाठी पैसा मिळतो, पण शहरातील खेळाडूंसाठी साधे क्रीडा संकुल सुरु केले जात नाहीत. फेरनिविदा मागवण्यामागे इच्छुक व मर्जीतील कंत्राटदाराशी असलेले साटेलोटे व त्यास काम मिळावे म्हणून चाललेला सर्व खटाटोप असल्याचे सामंत म्हणाले. या संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करून निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. निवड समितीने स्वहिताचा निर्णय घेतला असल्याने तो रद्द करा अशी मागणी त्यांनी केली.