शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

अतिरिक्त शिक्षक अन्यत्र

By admin | Updated: September 17, 2016 02:02 IST

जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील ३५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यापैकी प्राथमिकच्या १५४ पैकी २७ शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागी सामावून घेण्यात आले

ठाणे : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील ३५४ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यापैकी प्राथमिकच्या १५४ पैकी २७ शिक्षकांना जिल्ह्यातील रिक्त जागी सामावून घेण्यात आले असून उर्वरित १२७ शिक्षकांची जागेअभावी अन्य जिल्ह्यांत रवानगी केली आहे. याप्रमाणेच माध्यमिकच्या २०० शिक्षकांच्या समायोजनाचे काम मागील दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी शिक्षकांनी एकच गर्दी केली आहे.अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना स्वत:च्या जिल्ह्यात प्राधान्याने सामावून घेण्याचे काम राज्यभर सुरू करण्यात आले आहे. ठाण्यात ते बुधवारपासून सुरू झाले. यामध्ये जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या १५४ प्राथमिक शिक्षकांपैकी २७ शिक्षकांचीच ठाणे जिल्ह्यात वर्णी लागली. यात २१ प्राथमिक व सहा पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. यानंतरही १२७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांना आता उपसंचालकांकडे वर्ग केले आहे. आता या शिक्षकांना कोकण विभागातील मुंबईसह पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत रिक्त असलेल्या जागांवर सामावून घेतले जाणार आहे. या वेळी दिलेल्या शाळेवर हजर न झालेल्या शिक्षकांचे वेतन रोखले जाणार आहे. याप्रमाणेच माध्यमिकचे २०० शिक्षक अतिरिक्त असून तितक्याच जागा जिल्ह्यात रिक्त आहेत. या रिक्त जागी शिक्षकांची वर्णी लावण्यासाठी येथील मंगला हायस्कूलमध्ये काम सुरू आहे. आॅनलाइन पद्धतीने हे काम दोन दिवसांपासून सुरू आहे. रिक्त असलेली जागा भरण्यासाठी जात प्रवर्ग व विषय हे दोन निकष लावले जात आहेत. परंतु, प्रवर्गनिहाय जागा रिक्त दिसत असल्या तरी त्या ठिकाणी विषय नाही किंवा विषय असून जागा खुल्या किंवा मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. यामुळे बहुतांशी शिक्षकांची जिल्ह्यात वर्णी लावताना अडथळे येत असल्याचे निदर्शनास आले आहे. (प्रतिनिधी)