शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

पर्यटनातून ‘भारत जोडो’

By admin | Updated: November 17, 2016 06:56 IST

पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी आम्ही लडाखमध्ये विविध प्रयत्न केले. हे प्रयत्न कधीच व्यावसायिक दृष्टिकोनातून केले नाही.

कल्याण : पर्यटन क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी आम्ही लडाखमध्ये विविध प्रयत्न केले. हे प्रयत्न कधीच व्यावसायिक दृष्टिकोनातून केले नाही. सामाजिक बांधीलकीतून हे काम हाती घेतले आणि आता त्याचा परिणामही दिसत असल्याचे आत्माराम परब यांनी सांगितले. सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे ‘देशभक्तीपर पर्यटन’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इतिहास संशोधक सदाशिव टिटविलकर, अतुल गुरू, संस्थेचे दीपक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. परब यांनी लेह-लडाख येथे १०० हून अधिक वेळा सहली आयोजित क रून २५ हजारांपेक्षा अधिक पर्यटकांना सहल घडवून आणली आहे. व्यवसाय करणे, हे उद्दिष्ट असते तर नोकरी कधीच सोडली नसती. वेगळं काहीतरी करायचं एवढंच मनात होते. त्यातूनच, हिवाळ्यातील हे पर्यटन आम्ही विकसित केले. त्यामुळे लडाख येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. सर्वांनी एकदा तरी लडाखला भेट द्यावी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. परब पुढे म्हणाले, मला फिरण्याची खूप आवड होती. उन्ह्याळ्याच्या सुटीत मामाच्या गावी जात असे. त्यातूनच निसर्गात भटकण्याची आवड निर्माण झाली. नोकरी करीत असताना ट्रेकिंगला जात असे. यातूनच या पर्यटन व्यवसायात आलो. त्यातून आवड जोपासता आली. कोणत्याही परिस्थितीत स्वत:चे नुकसान झाले तरी टूर रद्द करायची नाही, हे तत्त्व ठरवले होते. लडाखला जात असताना येथील आर्मीशी संबंध आला. त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. सैनिकांकडून आम्हाला वाचण्यासाठी काहीतरी आणून द्या, अशी मागणी होऊ लागली तेव्हा रक्षाबंधनाला पुस्तके भेट म्हणून दिली. प्रथम मराठी पुस्तके दिल्याने अमराठी सैनिकांना ती वाचण्यास त्रासदायक ठरली. म्हणून मग त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक आणि भाषिक पुस्तके उपलब्ध करून दिली. पुढील काळात सैनिकांसाठी नाटकांचे प्रयोग ठेवले जाणार आहेत. आपण जे काम करू, त्यातून समाजहित जोपासले पाहिजे. पर्यटनातून ‘भारत जोडो’ साध्य करण्यास मदत होते. (प्रतिनिधी)