शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मतदारयादी ‘आधार’ला जोडा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:04 IST

मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत.

बदलापूर : मुरबाड मतदारसंघातील मुरबाड, कल्याण ग्रामीण आणि बदलापूर शहर या तिन्ही ठिकाणी जे मतदार आहेत त्यातील अनेक मतदारांची नावे ही दोन ते चार वेळा आली आहेत. दुबार मतदार आणि काही बोगस मतदारांचा आकडा पाहिल्यास सरासरी २५ हजाराहून अधिक आहे. या मतदारांना मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रीया लांबणीवर पडत आहे. त्यामुळे आता मतदारयादी ही आधार कार्डसोबत जोडण्याची मागणी नगरसेवक कॅप्टन आशिष दामले यांनी केलीआहे.मुरबाड मतदारसंघातील मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. मतदारसंघातील एका व्यक्तीचे नाव शोधल्यावर त्या व्यक्तीचे त्याच मतदारसंघात इतरत्रही नाव सापडत आहेत. काही नावे असे आहेत की त्यांची याच मतदारसंघात तीन ते चार ठिकाणी नावे आहेत.बाहेरील मतदारांचीही नावे मुरबाड मतदारसंघात टाकण्यात आली आहेत. हे बोगस मतदार आणि दुबार नावे असलेल्या मतदारांना वगळण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र त्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. मतदारयादीतील घोळ हा वाढत असून या मतदारयादीतील घोळ कमी करण्यासाठी मतदारयादी थेट आधारकार्डाशी जोडण्याची मागणी दामले यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाचे काम सुरू असले तरी मतदारांना आधार सोबतत जोडणे सक्तीचे करण्याची गरज आहे. यामुळे बोगस मतदान होणार नाही असे ते म्हणाले. मतदारयादीमध्ये फोटो बंधनकारक केल्यावर ९० टक्के फोटोचे काम झालेले आहे.