शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

युती होऊ नये हीच कार्यकर्त्यांची इच्छा; तिकिटासाठी भाजप इच्छुकांच्या वरिष्ठांकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 22:42 IST

विशेष म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेची धडपड सुरु आहे.

- अजित मांडके

ठाणे : एकीकडे युतीबाबत अद्यापही फॉर्म्युला निश्चित होत नसल्याने शिवसेनेने स्वबळाची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपमध्येही तशी चाचपणी सुरू आहे. मात्र, मागील विधानसभेपाठोपाठ आता लोकसभेत मिळालेल्या यशामुळे पक्षात अनेक इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. त्यामुळेच ठाण्यातून अनेकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी वरिष्ठांकडे ये-जा सुरु आहे.

विशेष म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेची धडपड सुरु आहे. मात्र, भाजप ठाणे शहर मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात अद्यापही युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. वरिष्ठ जरी युती होणार असल्याचे सांगत असले तरी ती होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजपमधील इच्छुकांनी मात्र देव पाण्यात ठेवले आहेत. त्यामुळेच शिवसेनेपाठोपाठ भाजपमध्ये देखील काही जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे.

यासाठी काहींनी सोशल मीडियावर आपला प्रचार सुरू केला आहे, तर काहींनी घरोघरी जाऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे, काहींनी तर तिकीट आपल्यालाच मिळणार असा थेट दावा केला आहे. केवळ मागील लोकसभा निवडणूक त्यांनतर झालेल्या विधानसभा आणि यंदा पुन्हा लोकसभेत मिळालेल्या यशाच्या जोरावर आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी वरिष्ठांकडे घिरट्या घालण्यास सुरुवात केली आहे.

आधीच मोदी लाटेमुळे काही जण कसेबसे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. मात्र, असे असतानाही त्यांना आतापासूनच आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. यासाठी काही जण आशिष शेलार, काही थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असलेल्या नेत्याला मध्यस्थी करून तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे ठाण्यात त्यांच्याच पक्षाचा विद्यमान आमदार असतानाही त्याठिकाणीही काही इच्छुकांनी प्रभावी दावा केला आहे.भाजपने सुद्धा ठाण्यातील बहुतेक मतदारसंघात एक नव्हे तीन तीन सर्व्हे केले आहेत. यामध्ये विद्यमान आमदाराकडून कशी कामे झाली, ते पुन्हा निवडून येऊ शकतात की नाही, नवीन चेहरा दिला तर काय परिणाम होऊ शकतो, आदींसह इतर काही महत्त्वाच्या बाबीही या सर्व्हेत तपासल्या आहेत.

ठाण्यासाठी शिवसेनेकडून दबावदुसरीकडे शिवसेनेने ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा केला असून तो मिळावा यासाठी वरिष्ठांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तसेच स्थानिकांकडूनही या मतदारसंघासाठी दबाव टाकला जात आहे. परंतु, प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक आमदार असावा असे भाजपचे धोरण असल्याने ते हा मतदारसंघ शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणे