शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मामा - भांजे डोंगरावरील 'लॅण्ड जिहाद' विरोधात होणार कारवाई, ठाणे पोलिसांची मनसेला लेखी हमी

By अजित मांडके | Updated: May 4, 2023 17:12 IST

अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे.

ठाणे : दोन दिवसांपूर्वी अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत दोन्ही दर्ग्याच्या आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येणार असल्याची पोलिसांनी पत्राद्वारे हमी दिली आहे.

येऊरमधील या मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना पत्रव्यवहार करून येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी केली होती. मात्र, ढिम्म प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. 

येऊरमधील मामा भांजे डोंगरावर गेले बरेच वर्षांपासून दोन दर्गे आहेत. त्यापैकी एक दर्गा हा वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून दुसरा दर्गा श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. या दोन्ही दर्ग्याचे आजूबाजूला असलेले अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत शासकीय स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच हे अतिक्रमण वन विभागाच्या जागेवर असल्याने अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी वन विभाग आणि ठाणे महानगरपालिकेची असून संबंधीत विभागाला पोलिसांनी लेखी पत्राद्वारे कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.         भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करूनही वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्यासंदर्भात कोणतीच पावलं उचलली नव्हती. अखेर मनसेने अतिक्रमण हटविण्यासंदर्भात प्रशासनाला मागणी केली. त्यानंतर दोन दिवसातच अखेर प्रशासनाला जाग आली असून याची दखल घेत कारवाई होण्याची हमी पोलिसांनी पत्राद्वारे दिली आहे तसेच या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कृत्य न करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :thaneठाणे