शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवरही करणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:44 IST

ठाणे: पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त झाले. खड्डेही भरले. मग ते पुन्हा का उखडले? पाऊस आला की रस्ते उखडले, हे ...

ठाणे: पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त झाले. खड्डेही भरले. मग ते पुन्हा का उखडले? पाऊस आला की रस्ते उखडले, हे खपवून घेतले जाणार नाही. यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर रस्ते आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांची गुणवत्ता तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रस्ते विकास महामंडळाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाण्यातील खड्ड्यांची पाहणी दौऱ्यात दिले.

ठाण्यातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडीला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. याचा फटका अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनाही गुरुवारी बसला. अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरांसाठी दोन ते अडीच तासांचा अवधी लागत असल्यामुळे पालकमंत्री शिंदे यांच्यावर महाविकास आघाडीमध्ये सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही टीकेची झोड उठवून आंदोलनाचा इशारा दिला. या सर्वच घटनांची गांभीर्याने दखल घेऊन शिंदे यांनी ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथून शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास पाहणी दौरा केला. याच दौऱ्यावेळी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, एसएसआरडीसी, एमएमआरडीए तसेच मेट्रोचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कामे करताना गुणवत्ता तपासा

- महापालिकेसह सर्व यंत्रणांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवून कामे करतांना गुणवत्ता राखली पाहिजे. जर एखादा ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असेल तर त्याला काळ्या यादीत टाका. पैसे घेऊन कामे निकृष्ट होणार असतील तर खपवून घेतले जाणार नाही. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही. काळ सोकावता कामा नये.

- पावसाळ्यापूर्वी कामे होऊनही पावसानंतर रस्ते उखडले कसे? त्याची गुणवत्ता, डांबराचे प्रमाण, तापमान हे सर्वच चांगल्या प्रकारे तपासले गेले पाहिजे. यापुढे केवळ ठेकेदारांवरच नाहीतर अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाईचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. आनंदनगर येथे पाऊण तास स्पॉटवरच अधिकाऱ्यांची शाळा घेतल्यानंतर शिंदे पुढे पाहणीसाठी भिवंडीकडे रवाना झाले.

----------