शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरावर बुलडोझर, कल्याण पूर्वेतील मंदिर, गणेशोत्सवात टळली होती कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 03:18 IST

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने पूर्वेतील बेकायदा गणेश मंदिरावरील कारवाई तात्पुरती स्थगित केली होती. अखेर या मंदिरावर मंगळवारी केडीएमसीने बुलडोझर चालवला.

कल्याण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसीने पूर्वेतील बेकायदा गणेश मंदिरावरील कारवाई तात्पुरती स्थगित केली होती. अखेर या मंदिरावर मंगळवारी केडीएमसीने बुलडोझर चालवला. दरम्यान, न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना मंदिर तोडल्याचा आरोप येथील हनुमान सेवा मंडळाने केला आहे.उच्च न्यायालयाने रस्त्यात अडथळा ठरणारी तसेच पदपथावरील बेकायदा प्रार्थनास्थळे हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत केडीएमसीला आपल्या हद्दीतील अशा प्रार्थनास्थळांवर कारवाई करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावयाचा आहे. त्यामुळे महापालिकेने बेकायदा धार्मिक स्थळांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सर्वात अगोदर रस्ता वाहतुकीला अडथळा ठरलेले कल्याण पश्चिमेतील सुभेदारवाडा शाळेलगतचे दुर्गामाता मंदिर तोडण्यात आले. त्यानंतर १० जुलैला डोंबिवली पश्चिमेतील रेल्वेस्थानकासमोरील पदपथावरील जुन्या गणपती मंदिरावर महापालिकेने हातोडा चालवाला. रस्त्यात अडथळा न ठरणारे आणि एका आडोशाला असलेल्या या मंदिरावर झालेली कारवाई भाविकांच्या जिव्हारी लागली होती.गणेशोत्सवाच्या तोंडावर १८ आॅगस्टला कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील गणेश मंदिरावर कारवाईसाठी महापालिकेचे पथक गेले होते. त्याची माहिती मिळताच १५० ते २०० भाविकांनी गर्दी करत कारवाईला तीव्र विरोध केला. गणेशोत्सवाच्या धर्तीवर कारवाई होऊ दिली जाणार नाही, असा पवित्रा भाविक व हनुमान सेवा मंडळाने घेतला होता. त्यावेळी उपस्थित भाविकांनी सामूहिक आरतीही म्हंटली होती. हा विरोध पाहता तसेच गणेशोत्सवानंतर कारवाई करू देण्याची लेखी हमी घेतल्यानंतर महापालिकेने ही कारवाई तात्पुरती स्थगित केली होती.दरम्यान, महापालिकेच्या ‘जे’ प्रभाग कार्यालयाने मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात ३० वर्षे जुने असलेले हे गणेश मंदिर तोडले. या कारवाईमुळे भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.>मूर्ती स्वीकारण्यास मंडळाचा नकारमंगळवारच्या कारवाईच्या वेळी येथील गणपतीची मूर्ती मंदिराची सेवा करणाºया हनुमान सेवा मंडळाच्या ताब्यात दिली जात होती. परंतु, कारवाईला न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना महापालिकेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ ही मूर्ती स्वीकारण्यास मंडळाच्या पदाधिकाºयांनी नकार दिला. अखेर महापालिकेने ही मूर्ती ताब्यात घेतली. न्यायालयाचा स्थगिती असतानाही पालिकेने कारवाई केल्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण दिघे यांनी सांगितले. याबाबत ‘जे’ प्रभाग अधिकारी भागाजी भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.