शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 00:46 IST

रेल्वेस्टेशन परिसरातील भूखंड मोकळा । पोलीस बंदोबस्तामध्ये हटवल्या झोपड्या, स्टॉल

उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्टेशन (पश्चिम) परिसरातील महापालिकेच्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रम करण्यात आले आहे. या भूखंडावरील झोपड्या, स्टॉल आणि टपऱ्यांवर महापालिकेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने ही कारवाई करून अतिक्रमण हटवले.

महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर केलेल्या या कारवाईत ५० झोपड्या, २० स्टॉल आणि ८ टपºया आदी अतिक्रमणे दूर करण्यात आली आहेत. रस्त्यांवर केलेल्या अतिक्रमणांबाबतही आयुक्तांनी इशारा दिला आहे. उल्हासनगर कॅम्प नं. ३ येथील रेल्वे स्टेशनशेजारील आरक्षित भूखंडावर झोपड्या, लोखंडी स्टॉल, टपºया बांधण्यात आल्या होत्या. या प्रकारामुळे या परिसरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले होते. याठिकाणी पालिकेने यापूर्वीही कारवाई केली होती. मात्र कारवाई केल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा बेकायदे बांधकामे उभ्या राहिल्या होत्या. याबाबत आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे तक्रारी गेल्यानंतर त्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शिंपी यांनी शनिवारी ही कारवाई केली.शिंपी यांच्या अतिक्र मण पथकाने पोलीस संरक्षणात झोपड्यांवर धडक कारवाई केली. एकाच वेळी ५० झोपड्या, २० स्टॉल आणि आठ टपºया तोडण्यात आल्याचे शिंपी यांनी सांगितले. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी स्वत: उभे राहून धडक कारवाई केली असून या कारवाईने अतिक्रमणधारकात धडकी भरली आहे. मात्र या कारवाईत सातत्य न राहिल्यास पुन्हा त्याच जागी बांधकामे उभी राहण्याची शक्यता आहे.रस्त्यांवरील अतिक्रमणेही हटवण्याची नगरसेवकांची मागणीशहरातील इतर पालिका भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच बहुतांश रस्त्यावर अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यावरही पालिकेने कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवक करीत आहेत. रेल्वे स्टेशनकडे येणारा वालधुनी नदीवरील पूल नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्याची मागणी यानिमित्तानेकेली जात आहे.

टॅग्स :thaneठाणे