शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलवाडीतील पोलीस वसाहतीवरील कारवाई थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:47 IST

उल्हासनगर कॅम्प नं.-४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला व एनसीटी शाळेसमोर पोलीस वसाहत आहे. एनसीटी स्कूलसमोरील बैठ्या चाळींची निवासस्थाने धोकादायक झाल्याने, अनेक वर्षांपासून ती बंद आहेत.

उल्हासनगर : विठ्ठलवाडी पोलीस वसाहतीवर चक्क सनद दिल्याचा प्रकार पालिकेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला. वसाहतीवरील पाडकाम कारवाईचा प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितल्यावर, पोलिसांनी प्रांत कार्यालयात धाव घेऊन कारवाई थांबवण्याची विनंती केली. या प्रकाराने सनद घोटाळ्याची चर्चा रंगून सनदच्या चौकशीची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

उल्हासनगर कॅम्प नं.-४ येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला व एनसीटी शाळेसमोर पोलीस वसाहत आहे. एनसीटी स्कूलसमोरील बैठ्या चाळींची निवासस्थाने धोकादायक झाल्याने, अनेक वर्षांपासून ती बंद आहेत. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याशेजारील तीन बहुमजली इमारती धोकादायक घोषित झाल्यावर, त्या खाली करण्यात येऊन त्यांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती तत्कालीन पोलीस उपायुक्तांनी दिली होती. सकाळी १० वाजता एनसीटी स्कूलसमोरील बंद पोलीस वसाहतीवर पाडकाम कारवाई सुरू होती. त्यावेळी तेथून जाणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी चौकशी केली असता वसाहतीच्या जागेवर भोईर नामक व्यक्तीला सनद मिळाल्याचे कळले. या प्रकाराने बोडारे यांना धक्का बसला. हा प्रकार त्यांनी विठ्ठलवाडी पोलिसांसह पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना सांगितला.

विठ्ठलवाडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोमे यांनी पवई चौक येथील प्रांत कार्यालयात धाव घेऊन पोलीस वसाहतीवरील पाडकाम कारवाईचा प्रांताधिकारी जगजितसिंग गिरासे यांना जाब विचारून कारवाई थांबवण्याची विनंती केली. त्यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता, वसाहतीवर चक्क सनद दिल्याचे उघड झाले. धनंजय बोडारे यांच्या सतर्कतेमुळे बंद पोलीस वसाहती पाडकाम कारवाईपासून वाचल्या असून प्रांताधिकारी कागदपत्रांची चौकशी करून पुढील निर्णय घेणार असल्याची माहिती भोमे यांनी पत्रकारांना दिली. शेवाळे यांच्याशी संपर्क केला असता, ही जागी पोलीस वसाहतीची आहे. बैठ्या चाळी धोकादायक झाल्याने, वसाहत बंद ठेवल्याची माहिती देऊन पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.

सनद म्हणजे काय?देशाच्या फाळणीच्या वेळी विस्थापित सिंधी समाजाला कल्याण शहराजवळील लष्करी छावणीतील बरॅक व खुल्या जागेत वसवण्यात आले. या वसाहतीला उल्हास नदीवरून उल्हासनगर नाव देण्यात आले. सन १९६० पूर्वी ज्यांचा खुल्या जागेवर ताबा अथवा कब्जा आहे, त्यांना प्रांत कार्यालयाकडून सनद म्हणजे मालकी हक्क दिला जातो. मात्र, भूमाफियांनी धनदांडगे, प्रांत कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना हाताशी धरून शहरातील अनेक आरक्षित भूखंड व खुल्या जागांवर ताबा दाखवून बनावट सनद मिळवली. यामध्ये कोट्यवधींचा व्यवहार होत असून प्रांत कार्यालयातील अनेकांना सनदप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागली आहे.

सनदप्रकरणी चौकशीची मागणीप्रांत कार्यालयाने पर्यायी जागा म्हणून पोलीस वसाहतीचा भूखंड, कॅम्प नं.-४, संतोषनगर येथील जुन्या सिंधी आयटीआयचा चार एकरचा भूखंड, कॅम्प नं.-५, कुर्ला कॅम्प येथील एमजेपीचा वसाहतीच्या जागेसह भूखंड, गोलमैदान व कॅम्प नं.-५ येथील पोलीस आरक्षित वसाहत भूखंड, अ‍ॅम्बोसिया हॉटेलशेजारील भूखंड तसेच अनेक खुल्या जागा पर्यायी जागांच्या नावाखाली धनदांडग्यांना सनद दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. या प्रकाराने प्रांत कार्यालय वादात सापडले असून सनद प्रकाराच्या चौकशीची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे.