शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By अजित मांडके | Updated: January 12, 2024 13:57 IST

अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ठाणे महापालिकेची धडक मोहीम

ठाणे : ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि प्रभाग समिती यांनी गुरूवारी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत दिव्यातील ०७, मुंब्रा येथील ०२, कळव्यातील ०२ आणि माजिवडा-मानपाडा भागातील दोन अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. तसेच, दिवा भागात एकूण १९ अनधिकृत नळजोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्यात आल्या.

ठाणे महापालिका क्षेत्रात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार अनधिकृत बांधकामांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामे पूर्णपणे निष्कासित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत.

दिवा भागात, एम एस कम्पाऊंड - डीपी रस्ता भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील तर दुसऱ्या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील कॉलम पाडण्यात आले. दिवा पूर्व श्लोक नगर येथे सहा मजल्यांच्या अंशत: व्याप्त असलेल्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब तोडण्यात आला. तसेच, जिनेही पाडण्यात आले. याच भागात आरती अपार्टमेंटसमोरील अनधिकृत इमारतीच्या तळमजल्यावरील गाळे तोडण्यात आले. सीताराम पाटील नगर येथील काही प्रमाणात व्याप्त असलेल्या सहा मजल्याच्या अनधिकृत इमारतीचे जिने तोडण्यात आले. तसेच, सेंट मेरी शाळेजवळील अनधिकृत पायलिंग तोडण्यात आले.

मुंब्रा येथील राणा नगर भागात अनधिकृत चौथरा, खांब काढण्यात आला. तन्वर नगर कॉम्प्लेक्समधील तळ आणि एक मजल्याचे आर सी सी बांधकाम पूर्णपणे काढण्यात आले. कळवा येथील कुंभार आळी भागात तळ मजल्याचे आर सी सी स्लॅब व दुसऱ्या मजल्या स्लॅबसाठी उभारण्यात आलेले सेंट्रीग व स्टीलचे बांधकाम काढण्यात आले. विटावा खाडीजवळील तिसऱ्या व चौथ्या मजल्याचे स्लॅब, तसेच, चौथ्या मजल्याचे अंतर्गत वीट बांधकाम तोडण्यात आले.

माजिवडा-मानपाडा भागात माजिवडा गाव येथे आरसीसीचे दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब व कॉलम तोडण्यात आले. तसेच, ओवळा नाका येथे चार अनधिकृत गाळ्यांवर कारवाई करण्यात आली.

१९ अनधिकृत नळजोडण्या खंडित केल्या

दिवा येथील श्लोक नगर, शास्त्री नगर, अंश नगर येथील एकूण १९ अनधिकृत नळ जोडण्या मुख्य जलवाहिनी पासून तोडण्यात आल्या. या कारवाईत पाणी पुरवठा विभागाने दोन मोटर पंप, २५ एमएमचे ६० मीटरचे आठ पाईप जप्त करण्यात आले.

टॅग्स :thaneठाणे