शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

वीजचोरांना झटका, टोरंट पॉवरने दाखल केले गुन्हे; वीज ताेडलेल्या ग्राहकांकडूनच हाेतेय चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2023 11:29 IST

टोरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीज चोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : टोरंट पॉवरने कळवा-मुंब्रा-शीळ भागात वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध आता जाेरदार कारवाई सुरू केली आहे. वीज जोडणी नियमित करण्यासाठी विविध माध्यमांतून अनेकदा आवाहन करूनही या भागातील ग्राहक नवीन वीज जोडणीसाठी अर्ज करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे आता ही कारवाई सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

या भागातील १५ हजारांहून अधिक घरे पीडी थकबाकीच्या नावाखाली बेकायदा वीज वापरत आहेत. अशा ग्राहकांनी त्यांची प्रलंबित पीडी  देय रक्कम भरून कायदेशीररीत्या वीज मीटर मिळवावेत, असे आवाहन टोरंट पॉवर कंपनीने केले आहे.  कायदेशीर जाेडणीसाठी या भागातील रहिवासी पुढे येत नाहीत.सुमारे २१ हजार ५०० जाेडण्या शून्य किंवा त्याहून खूप कमी युनिट वापर दर्शवितात. यातील अनेकांचे मीटर सदोष असल्याचा किंवा मीटरमध्ये छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे. अशा लोकांचे मीटर त्वरित बदलणे आवश्यक आहे. अशा वीजचोरांमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होत आहे. त्यांना लाइन ट्रिपिंग आणि नेटवर्क बिघाडाचा सामना करावा लागतो. 

टोरंट कंपनीने नुकतीच मीटरमध्ये छेडछाड आणि वीज चोरीविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून पोलिसांत वीजचोरीचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाइमुळे आता वीजचाेरांचे धाबे दणाणले आहेत.

तीन वर्षे कारावास किंवा दंडाची तरतूदवीजचोरी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करीत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. विद्युत कायदा, २००३  नुसार, वीजचोरी हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी  तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंडाची तरतूद असल्याची माहिती कंपनीने दिली.