शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिकेची अतिक्रमणे अन् अनधिकृत बांधकामांवर कारवाई

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: December 26, 2023 17:55 IST

दिवा प्रभाग समितीमध्ये एम. एस. कम्पाऊंड येथे तीन मजली बांधकाम पूर्णत: पाडण्यात आले

ठाणे : सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रात दिवा, कळवा, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती विभागातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिकेचा अतिक्रमण विभाग, परिमंडळ यांनी ही कारवाई केली आहे.             

दिवा प्रभाग समितीमध्ये एम. एस. कम्पाऊंड येथे तीन मजली बांधकाम पूर्णत: पाडण्यात आले. तसेच, दुसऱ्या बांधकामाचे प्लिंथ, २५०० चौ. फूटांचे बांधकाम, २५ कॉलम तोडण्यात आले. त्याशिवाय, दोन मजल्याचे आरसीसी बांधकाम, ४० कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तोडण्यात आले. दोन पोकलेन, तीन जेसीबी, ५० कामगार, ४० पोलीस कर्मचारी व आरक्षक यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. दिवा पूर्व येथे मुंब्रा देवी कॉलनी येथे २२ कॉलमचे प्लिंथचे बांधकाम तसेच, फाउंडेशनची दोन बांधकामे पूर्णपणे काढण्यात आली. एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार आणि ३० पोलीस यांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कळवा प्रभाग समितीत स्वामी समर्थ मठाजवळील ३५ खोल्यांचे बांधकाम एक पोकलेन, दोन जेसीबी, ४० कामगार, ३० पोलीस यांच्या सहाय्याने पाडण्यात आले. तर, विटावा येथे प्लिंथचे बांधकाम काढण्यात आले. तेथे एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार, ३० पोलीस कार्यरत होते. माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत बाळकूम येथील स्मशानभूमीसमोर लागून असलेले सहा मजल्याच्या आरसीसी बांधकामातील पाचव्या आणि सहाव्या मजल्याचे बांधकाम काढण्यात आले. त्यासाठी तीन ट्रॅक्टर ब्रेकर, एक पोकलेन, दोन जेसीबी, ३० कामगार आणि ३० पोलीस यांचे सहाय्य घेण्यात आले. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात अशापद्धतीने नियोजनबद्ध धडक कारवाई सर्वच प्रभाग समिती क्षेत्रात टप्प्याटप्प्याने हाती घेतली जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेMuncipal Corporationनगर पालिका